महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये तीन जण कोरोनाबाधित, एकाचा मृत्यू

बुधवारी पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे दापोडी, वाकड आणि मृत्यू झालेली महिला ही मार्केट यार्ड गुलटेकडी पुणे या परिसरातील आहे, असे महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

corona pcmc
corona pcmc

By

Published : Apr 23, 2020, 8:47 AM IST

पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी तीन जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यातील एका महिलेचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असून त्याचा पॉझिटिव्ह रिपोर्ट बुधवारी आला आहे. शहरातील कोरोना पॉझिटिव्हची एकूण संख्या ही ६७ वर पोहचली असून पैकी ९ जणांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, शहरात कोरोनाने तीन जणांचा मृत्यू देखील झाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा पारा चढत असल्याचे पहायला मिळत असून बुधवारी तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. पैकी महिलेचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. त्याचा अहवाल हा पॉझिटिव्ह आलेला आहे. आत्तापर्यंत तब्बल २० जण कोरोनामुक्त झालेले आहेत. त्यापैकी दोन जणांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे.

नागरिकांनी घराबाहेर पडू नका, असे वारंवार सांगितलं जात आहे. परंतु, काही नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्याचे दिसत आहे. बुधवारी पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे दापोडी, वाकड आणि मृत्यू झालेली महिला ही मार्केट यार्ड गुलटेकडी पुणे या परिसरातील आहे, असे महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details