पुणे : सध्या आपल्या देशात आयपीएल मोठ्या प्रमाणात सुरू असून आयपीएलच्या सामन्यांदरम्यान देशभरात अनेक ठिकाणी बेटिंगच्या घटना घडत आहे. आज याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पुण्यातही कारवाई केली आहे. कोंढवा येथे सट्टेबाजीप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विविध वेबसाइट्सच्या माध्यमातून बेटिंग सुरू होती. याप्रकरणी वसीम हनिफ शेख रा. कोंढवा, इक्रामा मकसूद मुल्ला रा.ए. घोरपडी पेठ, आणि मुसबीत महमूद बशैब रा सोमवार पेठ यांना अटक करण्यात आली आहे. . पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील एका प्रसिद्ध पबच्या मालकासह मुंबई, मध्य प्रदेश, दुबईतील बुकीजची माहिती समोर आली आहे.
आयपीएल मॅचसाठी क्रिकेट बॅटिंग :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील साईबाबा नगर येथील धनश्री सिग्नेचर सोसायटीमध्ये असलेल्या एका बंद फ्लॅटमध्ये आयपीएल मॅचसाठी क्रिकेट बॅटिंग सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वसीम हनिफ शेख, इकरामा मकसूद मुल्ला, मुसबीत मेहमूद बशैब हे तिघे मोबाईलवर ऑनलाईन क्रिकेट खेळत असल्याचे आढळून आले. या छाप्यामध्ये ५ मोबाईल, १ लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. तसेच गुन्हा दाखल करण्यात आला. कोंढवा पोलीस स्टेशन क्र. 519/2023 अन्वये 420, 34 आयपीसी, जुगार प्रतिबंधक कायदा 4(अ) 5, भारतीय टेलिग्राफ कायदा 25(क) अंर्तगत पुढील तपास पोलीस करीत आहेत.