महाराष्ट्र

maharashtra

पुणे : रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक, 27 लाखाचे रक्तचंदन जप्त

By

Published : Jun 9, 2021, 3:35 PM IST

पोलिसांनी लोणी काळभोर परिसरात रक्त चंदनाची तस्करी करण्यासाठी आलेल्या तिघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून 27 लाख रुपये किमतीचे 270 किलो रक्तचंदन जप्त केले आहे.

पुणे : रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक, 27 लाखाचे रक्तचंदन जप्त
पुणे : रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक, 27 लाखाचे रक्तचंदन जप्त

पुणे - गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लोणी काळभोर परिसरात रक्त चंदनाची तस्करी करण्यासाठी आलेल्या तिघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून 27 लाख रुपये किमतीचे 270 किलो रक्तचंदन जप्त केले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने ही कारवाई केली.

रक्तचंदन विक्री करण्यासाठी लोणी काळभोर परिसरात येणार
विकी संजय साबळे (वय 19, रा. मांजरी), रोहित रवी रुद्राप (वय 20, रा. कोंढवा) यांच्यासह रक्तचंदनाचा पुरवठा करणाऱ्या अँनेल कन्हैया वाघमारे (वय 25, रा. कोंढवा) याला पोलिसांनी अटक केली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी, की गुन्हे शाखेचे पोलीस शहरात गस्त घालत असताना त्यांना कोंढवा परिसरातून एका वाहनातून काहीजण रक्तचंदन विक्री करण्यासाठी लोणी काळभोर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करत पोलिसांनी लोणी काळभोर परिसरातच आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला होता.

गाडी अडवून पाहणी केली
दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांना लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत संशयास्पदरित्या जाणारी एक पिकअप गाडी दिसली. पोलिसांनी ही गाडी अडवून पाहणी केली असता आता त्यांना आतमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तचंदनाचा साठा आढळला. पोलिसांनी गाडीत असणाऱ्या विकी साबळे आणि रोहित रुद्रा याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी अँनेल वाघमारेकडून रक्तचंदनाचा साठा आणला असल्याचे सांगितले. त्यानंतर लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून 27 लाखांचे 270 किलो रक्तचंदन आणि गाडी असा 32 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक विजय झंझाड, श्रीकांत चव्हाण, संपत अवचरे, प्रदीप शितोळे, शैलेश सुर्वे, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, अमोल पिळणे, भूषण शेलार यांच्या पथकाने केली.

ABOUT THE AUTHOR

...view details