महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वारी विशेष : गेल्या वीस वर्षांपासून तृतीयपंथी करत आहेत वारकऱ्यांची सेवा - जेवणाची आणि मोफत औषधांची व्यवस्था

गणेश पेठेतील ख्वाजा-सराओ का डेरा मठातील तृतीयपंथी गेल्या वीस वर्षांपासून पालख्यांसोबत येणाऱया वारकऱयांसाठी जेवणाची आणि मोफत औषधांची व्यवस्था करत आहेत. शहरात एकुण चारशेहून अधिक तृतीयपंथी आहेत.

वारकऱ्यांची सेवा करताना तृतीयपंथी

By

Published : Jun 27, 2019, 10:12 PM IST

पुणे - शहरात संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखींचे आगमन झाल्यानंतर प्रत्येकजण वारकऱ्यांची सेवा करण्यास आतूर असतो. ठिकठिकाणी पाणी वाटप, मोफत औषधे आणि जेवणाची व्यवस्था केली जाते. म्हणून महाराष्ट्राच्या या महान परंपरेत आपला ही सहभाग असावा या भावनेतून पुण्यातल्या गणेश पेठेतील तृतीयपंथीही या सेवेत सहभागी झाले होते.

वारी विशेष : गेल्या वीस वर्षांपासून तृतीयपंथी करत आहेत वारकऱयांची सेवा

गणेश पेठेतील ख्वाजा-सराओ का डेरा मठातील तृतीयपंथी गेल्या वीस वर्षांपासून पालख्यांसोबत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी जेवणाची आणि मोफत औषधांची व्यवस्था करत आहेत. शहरात एकुण चारशेहून अधिक तृतीयपंथी आहेत. त्यांनी दिलेल्या पैशातून वारकऱ्यांना जेवण, औषधे दिली जातात. पालखी शहरात आल्यानंतर येथील पेठांमधील परिसर हा टाळ -मृदांगाने दुमदुमून जातो. यावेळी वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी हे तृतीयपंथी सकाळपासून जेवणाची तयारी करतात.

विशेष म्हणजे, वारकऱ्यांना चपाती ऐवजी त्यांना आवडेल अशी भाकरी, घनसाळ तांदळाचा भात, खर्डा, भाजी हे सर्व तृतीयपंथी स्वत: बनवितात आणि त्यांना प्रेमाने वाढतात. अनेकदा या तृतीय पंथीयांना दुय्यम स्थान दिले याची सल मनात न ठेवता, ख्वाजा-सराओ का डेरा या मठातील तृतीयपंथी गेल्या वीस वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा करत आहेत. याचे समाधान येथील तृतीयपंथीय यांना आहे. अशा उपक्रमाचे वारकऱ्यांनी स्वागत केले आहे. यांनंतर हे तृतीयपंथी आपलेच आहेत या भावनेतून तृतीयपंथीयांनी प्रेमाने दिलेला अन्नाचा घास पोटात उतरवून पुढे मार्गस्थ होतात.

ABOUT THE AUTHOR

...view details