पुणे- देहूरोड परिसरातील चार दुकानांचे शटर तोडल्याचे समोर आले आहे. यामध्ये एकूण २० मोबाईल आणि काही रक्कम चोरल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये ४ दुकाने फोडली; घटना सीसीटीव्हीत कैद - मुख्य बाजार पेठ देहूरोड
तीन अज्ञात चोरांनी मध्यरात्री देहूरोड येथील मुख्य बाजार पेठेतील चार दुकानांचे शटर तोडले. दोन चोरांनी दुकानात प्रवेश केला, तर एक जण रस्त्यावर थांबून रेकी करत असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे.
तीन अज्ञात चोरांनी मध्यरात्री देहूरोड येथील मुख्य बाजार पेठेतील चार दुकानांचे शटर तोडले. दोन चोरांनी दुकानात प्रवेश केला, तर एक जण रस्त्यावर थांबून रेकी करत असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. दरम्यान, या चोरीत एकूण २० मोबाईल आणि काही रक्कम चोरी गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. तसेच सीसीटीव्हीमधील चोर कोणाला दिसल्यास तत्काळ देहूरोड पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणकर यांनी केले आहे.