पुणे -वाघोली परिसरात दुचाकीवरून येणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. परिसरातल्या एका सीसीटीव्हीमध्ये चोरटे कशा पध्दतीने धुमाकूळ घालतात हे कैद झाले आहे. पल्सर, युनीकॉर्न, अशा दुचाकीवरून आलेले ६ ते ७ चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
दुचाकीवरून चोरी करणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद - pune
वाघोली आणि परिसरामध्ये सध्या घरफोडीचे प्रमाण वाढत आहे. सोसायटीतील आणि बैठ्या घरातील बंद दरवाजे तोडून सामानाची उचकापाचक केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. वाघोलीजवळ बुधवारी एका घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दुचाकीवरून आलेले ७ चोरटे कैद झाले आहेत.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले सगळे चोरटे २० ते २५ वयोगटातील असून पाठीमागे सॅक अडकवलेली असल्याने महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याची शंका व्यक्त होत आहे. वाघोली आणि परिसरामध्ये सध्या घरफोडीचे प्रमाण वाढत आहे. सोसायटीतील आणि बैठ्या घरातील बंद दरवाजे तोडून सामानाची उचकापाचक केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. वाघोलीजवळ बुधवारी एका घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दुचाकीवरून आलेले ७ चोरटे कैद झाले आहेत. चोरट्यांनी समानाची उचकापाचक केली असली तरी त्यांच्या हाती काही ही लागले नाही.
तोंडाला रुमाल बांधलेले सातजण तीन जण दुचाकीवरून आले होते ; त्यांच्याकडे पल्सर, पल्सर २२०, युनीकॉर्न गाड्या आहेत. २० ते २५ वयोगटातील चोरट्यांनी पाठीमागे सॅक अडकविलेल्या असल्याने महाविद्यालयाचे विद्यार्थी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी पायी जाणाऱ्या दोघांना लुटणाऱ्या सहा जणांना लोणीकंद पोलिसांनी नुकतीच अटक केली असतानाच आता दुचाकीवरील चोरटे पकडण्याचे आव्हानही पोलीसांसमोर आहे. या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.