महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देशात निवडणुकीपूर्वी मोदींची लाट होती - अजित पवार - bellet paper

विधानसभा निवडणूक ही बॅलेट पेपरवर घेण्यास काही हरकत नसल्याचेदेखील ते यावेळी म्हणाले.

अजित पवार

By

Published : Jul 19, 2019, 7:11 PM IST

पुणे- देशात मोदींची लाट होती हे निवडणुकीपूर्वी केलेल्या सर्व्हेक्षणातून माहिती झाले होते, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या मेळाव्यात गुरुवारी बोलत होते. मोदींची लाट असल्याने नवीन चेहऱ्यांना संधी दिली. मात्र, तुम्हाला हे निवडणुकीपूर्वी सांगितले नाही, असे देखील पवार यावेळी म्हणाले.

देशात निवडणुकीपूर्वी मोदींची लाट होती - अजित पवार

दरम्यान, विधानसभा निवडणूक ही बॅलेट पेपरवर घेण्यास काही हरकत नसल्याचेदेखील ते यावेळी म्हणाले. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचे असा निश्चय लोकांनी केला होता. हे त्यावेळच्या सर्व्हेक्षणातून समजले होते, असे वक्तव्य करत बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, मंदी, बकाल शहरे आदींबाबत चर्चाच झाली नाही. तसेच सरकारी कंपन्या डबघाईला आल्याचे ते यावेळी म्हणाले. दरम्यान, पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी शिवसेनेला लक्ष करत मंत्रीमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या पीक विम्याविषयी मुद्दे मांडले जात नसल्याचे ते म्हणाले.

ईव्हीएमबद्दल अनेकांची वेगवेगळी मत आहेत. मध्यंतरी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. एकतर्फी निवडणुकांचे निर्णय लागले आहेत, असे काही जणांचे म्हणणे आहे. त्यामुळे ईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी गडबड आहे. जगामध्ये ताकदीच्या देशांमध्ये मशीनद्वारे निवडणूक न घेता त्या बॅलेट पेपरवर घेतल्या जातात. काही राजकीय पक्षांनी मागणी केली आहे की, किमान लोकांच्या मनातील समज गैरसमज दूर करण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका तरी बॅलेट पेपरवर घ्याव्यात. त्यामुळे मनात असणाऱ्या शंका दूर होतील. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी अजित पवार यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details