पुणे - चोरट्यांनी चक्क स्टेट बँक ऑफ इंडियाची एटीएम मशीन चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. दौंड तालुक्यातील पुणे-सोलापूर महामार्गावर यवत येथे शुक्रवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच पळवली; पुणे-सोलापूर महामार्गावरील घटना - पुणे-सोलापूर महामार्ग
यवत येथे पुणे-सोलापूर महामार्गाच्या बाजूला एसबीआयचे एटीएम आहे. चोरट्यांनी या एटीएम केंद्रातील एटीएम मशीनच उचलून नेली.
यवत येथे पुणे-सोलापूर महामार्गाच्या बाजूला एसबीआयचे एटीएम आहे. चोरट्यांनी या एटीएम केंद्रातील एटीएम मशीन उचलून नेली. या घटनेची माहिती यवत पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेरा तपासण्यात आला. त्यामध्ये चोरटे कैद झाले असून त्यांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच यामधून जवळपास ३० लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याचेही पोलीस म्हणाले.
पोलीस ठाण्याच्या जवळपासच्या परिसरातच हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.