महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

SSC RESULT : मुलगा बनला आईचा शिक्षक, दोघेही झाले उत्तीर्ण - SSC RESULT

विशेष म्हणजे 36 व्या वर्षी आईने दोन्ही मुलांच्या मदतीने माध्यमिक शालांन्त परीक्षेत 64.40 टक्के गुण मिळवत यश संपादन केले आहे.

Baramati
बारामती 10 वी निकाल

By

Published : Jul 29, 2020, 8:47 PM IST

बारामती - राज्यभर दहावीच्या परिक्षेत उतीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांंमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. मात्र, बारामती तालुक्यातील पारवडी गावातील गुरव कुटुंबात दहावीच्या परिक्षेचा निकालाचा आनंद व्दिगुणित आहे. कारण कुटुंबातील मुलगा आणि आई दोघे माय लेकरही एकाच वेळी उतीर्ण झाल्याची दुर्मिळ घटना बारामती तालुक्यात घडली आहे. बेबी गुरव सदानंद गुरव असे या मुुलाच आणि आईचे नाव आहे.

विशेष म्हणजे 36 व्या वर्षी आईने दोन्ही मुलांच्या मदतीने माध्यमिक शालांन्त परीक्षेत 64.40 टक्के गुण मिळवत यश संपादन केले आहे. त्यांचा थोरला मुलगा देखील दहावीच्या परिक्षेत 73.20 टक्के गुण मिळवत पास झाला आहे. कधी कधी मुलगा आपल्या आईला अवघड गणितं इंग्रजी विज्ञान विषयाचा अनाकलनीय भाग समजावून सांगत होता.

वर्षभर मुलगा सदानंद आपल्या आईचा शिक्षक बनला होता. त्यामुळे त्याचा ही अभ्यास झाला. कधी आई स्वयंपाक करताना शेजारी बसून जेवणारी दोन्ही मुलं आईला मार्गदर्शन करत. पुढे बारावीची परिक्षा पास होऊन पदवी मिळवण्याचा त्यांची महत्वकांक्षा आहे.

बेबी गुरव या बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये पायोनिअर कॅलिकोज कंपनीमध्ये शिवणकाम करतात. शिर्सुफळ (ता.बारामती) गावातील माहेरी कौटुंबिक कारणामुळे त्यांंची दहावी पास होण्याची महत्वकांक्षा पूर्ण होऊ शकली नाही. त्यांचा मुलगा सदानंद गुरव हा रयत शिक्षण संस्थेच्या नागेश्वर विद्यालय (शेटफळगढे ता. इंदापूर) येथे दहावीत शिकत होता. तर धाकटा मुलगा आठवीत शिकत होता. त्यांनी पतीच्या आग्रहास्तव दहावीची परिक्षा देण्याचा निर्णय घेतला. पती नामांकित वृत्तपत्र समुहाकडे पत्रकारितेचे काम करतात. त्यांनी प्रोत्साहन देत आत्मविश्वास वाढवला.

त्यांनतर बेबी यांनी बांदलवाडी येथील बालविकास विद्यालयातून बहिस्थ विद्यार्थी व परिक्षार्थी अर्ज भरला. दररोज सकाळी सकाळी घरकाम आटोपून आठ वाजता बारामती टेक्सटाईल पार्कमधील कपंनीत काम सुरू होईपर्यंत कंपनीच्या आवारात त्या अभ्यास करत. तर कामावरून सुटल्यावर बसची वाट पाहत अभ्यास सुरू असे.

एकुण दररोज पर्समध्ये पुस्तक घेऊनच त्या कामावर पोहचत, दिवसभराच्या कामानंतर रात्री घरकामातून वेळ मिळताच त्या अभ्यासात डोके घालत. त्यांनी दहावीतील यशाबद्दल आनंद व समाधान व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details