महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दगडूशेठ गणपती मंदिरात शहाळे महोत्सव साजरा - rahul wagh

आज पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शहाळे महोत्सवात तब्बल ५ हजार शहाळ्यांमध्ये दगडूशेठचे बाप्पा विराजमान झाले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

By

Published : May 18, 2019, 10:23 AM IST

पुणे- पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आज बाप्पांसमोर शहाळे उत्सव साजरा करण्यात आला. राज्यात वाढत्या उन्हापासून सर्वांचे रक्षण व्हावे, दुष्काळ, पाणी आणि शेतकऱ्यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात, यासाठी दगडूशेठ गणपती मंदिरात पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त शहाळे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

माहिती सांगताना अशोक गोडसे, अध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट


गणेशांचे विविध अवतार आहेत. त्यापैकी एक म्हणजे पुष्टीपती विनायक अवतार. पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शहाळे महोत्सवात तब्बल ५ हजार शहाळ्यांमध्ये दगडूशेठचे बाप्पा विराजमान झाले. नारळाची प्रतिकात्मक झाडे आणि शहाळ्यांनी सजविलेला मंदिराचा परिसर पाहण्यासाठी पुणेकरांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला.


अक्कलकोटचे (जि. सोलापूर) अ‍ॅड. रवींद्र खैराटकर यांनी गणपती बाप्पांना ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण केला. सकाळी ६ वाजता गणेशजन्म सोहळा पार पडला. त्यापूर्वी पहाटे पंडीत शौनक अभिषेक यांनी गायन सादर केले. आज दिवसभर भाविकांना शहाळ्यांचा हा उत्सव पाहता येणार असून उद्या ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार येतो.

ABOUT THE AUTHOR

...view details