पुणे (बारामती)- महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा ठामपणे उमटवला असे 'शरदचंद्रजी गोविंदराव पवार' यांचा आज वाढदिवस. बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे १२ डिसेंबर १९४९ साली शरद पवार यांचा जन्म झाला. तब्बल पाच दशकांहून अधिककाळ महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात अढळपणे आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे एक कुशल व्यक्तिमत्व म्हणून देशाचे माजी कृषी व संरक्षण मंत्री यांचा उल्लेख करावा लागेल. पवार यांचा राजकीय जीवन प्रवास जेवढा थक्क करणारा आहे तेवढाच प्रेरणादायी आहे. पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने ईटीव्ही भारतने त्यांच्या राजकीय जीवन प्रवासावर टाकलेला हा दृष्टीक्षेप-
शरद पवार यांचे काही दुर्मिळ फाईल फोटो शरद पवार यांचे काही दुर्मिळ फाईल फोटो शरद पवार यांचे काही दुर्मिळ फाईल फोटो कुटुंबातूनच मिळाले समाजकारण व राजकारणाचे धडे
शरद पवार यांची सामाजिक व राजकीय जडण-घडण त्यांच्या कुटुंबातूनच झाली. त्यांना राजकारण आणि समाजकारणाचे बाळकडू आई शारदाबाई पवार यांच्याकडून मिळाले. शारदाबाई पवार या स्वातंत्र्यपूर्व काळात पुणे जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात कार्यरत होत्या. तसेच, वडील गोविंदराव पवार हेही सहकारी चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते होते शिवाय त्यांचे बंधू वसंतराव पवार हे शेतकरी कामगार पक्षात होते. अशा कुटुंबात शरद पवार यांची लहानपणापासूनच राजकीय व सामाजिक कार्याची जडणघडण झाली. त्यामुळे शरद पवार हे शालेय व महाविद्यालयीन नेतृत्व उदयास आले. पुढे ते महाराष्ट्र राज्याचे तरुण मुख्यमंत्री व केंद्रात विविध खात्याचे मंत्री झाले.
शरद पवार यांचे काही दुर्मिळ फाईल फोटो शरद पवार यांचे काही दुर्मिळ फाईल फोटो शरद पवार यांचे काही दुर्मिळ फाईल फोटो वयाच्या २६ व्या वर्षी पहिल्यांदा झाले आमदार
सन १९६७ साली विधानसभा निवडणूक घोषीत झाली होती. तेव्हा २६ वर्षांचे शरद पवार हे युवा काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यावेळेसचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी शरद पवार यांना बारामतीतून विधानसभा निवडणूक लढविण्यास सांगितली. त्यावर पवारांनी होकार दर्शविला. मात्र, त्यावेळच्या बारामतीतील नेत्यांनी पवार यांच्या नावाला विरोध केला होता. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व प्रदेशाध्यक्ष पाटील त्यांनी पवारांच्याच नावावर शिक्कामोर्तब केले. व ते पहिल्यांदा वयाच्या २६ व्या वर्षी आमदार म्हणून निवडून आले.
१९७२ च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा झाले मंत्री
१९७२ च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत पवार पुन्हा एकदा बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून आले व वसंतराव नाईक यांच्या मंत्रीमंडळात मंत्री झाले. त्यांच्याकडे गृहराज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
आणीबाणी आणि मुख्यमंत्री
शरद पवार यांचे काही दुर्मिळ फाईल फोटो १९७५ साली आणीबाणीनंतर १९७८ मध्ये राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. तेव्हा राज्यातील काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते. यामध्ये नासिकराव तिरपुडे यांच्या नेतृत्वाखाली इंदिरा काँग्रेसचा एक गट होता. तर ब्रह्मानंद रेड्डी गटामध्ये यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार होते. या निवडणुकीत त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्याने दोन्ही काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन केली. वसंतराव दादा पाटील मुख्यमंत्री तर नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री झाले. पुढे अवघ्या चार महिन्यातच शरद पवार राज्याचे सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री झाले. पुढे १९८८ मध्ये पुन्हा पवार मुख्यमंत्री झाले. १९८८ नंतर पवारांनी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी हालचाली केल्या जून १९८८ मध्ये दुसऱ्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. राज्यातून शंकरराव चव्हाण यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आले. त्यांच्या जागी पवार यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. १९९० ला पुन्हा राज्यात विधानसभेच्या निवडणुका लागल्या. या निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आली. यावेळीही पवार तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. मात्र, एक वर्षानंतर त्यांना पुन्हा दिल्लीत बोलविण्यात आले. त्यांच्याजागी सुधाकर नाईक यांना मुख्यमंत्री पद देण्यात आले. पुढे १९९३ ला बाबरी मशीद प्रकरणावरून सुधाकर नाईक यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पवारांना पुन्हा महाराष्ट्रात बोलून चौथ्यांदा मुख्यमंत्री करण्यात आले.
शरद पवार यांचे काही दुर्मिळ फाईल फोटो शरद पवार यांचे काही दुर्मिळ फाईल फोटो शरद पवार यांचे काही दुर्मिळ फाईल फोटो पुरोगामी विचारांचे पवार
वयाच्या ऐंशीव्या वर्षीही पवार यांच्यातील ऊर्जा अनेकांसाठी प्रेरणा ठरावी अशीच आहे. माजी पंतप्रधान व्ही.पी सिंह यांच्यानंतर मागासवर्गीय समाजाला सामाजिक न्याय मिळवून दिला. त्यांनी भटक्या विमुक्तासाठी स्वतंत्र जागा ठेवण्याचा निर्णय घेतला. मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली. पवारांनी ७३ वी घटना दुरुस्ती करून इतर मागासवर्गीयांना स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रतिनिधित्व दिले. शरद पवारांनी हिंदु कोड बिलातील दुरुस्तीमुळे सर्व महिलांना वडिलोपार्जित संपत्तीत वाटेकरी बनवले. पुरोगामी विचार असल्यामुळे शरद पवारांनी स्त्री-पुरुष समानता सर्व जातींना समान संधी हे विचार अमलात आणले. महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे ते चालवत आहेत.
हेही वाचा -उताराला लागलेल्या काँग्रेसला राहुल गांधी सावरणार!, वाचा राऊतांनी केलेली 'रोखठोक' चर्चा