पुणे- खडकवासला परिसरातील गावठी दारू अड्डा महिलांनी उध्वस्त केला आहे. हा अड्डा अनेक दिवसांपासून सुरू असून पोलीस प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ महिलांनी या दारू अड्ड्यावर हल्लाबोल केला.
पुण्यात महिलांकडून गावठी दारू अड्डा उध्वस्त - RUPALI
खडकवासला धरणाजवळ असलेल्या लमाण वस्ती आणि लांडगे वस्ती येथे अनेक दिवसांपासून हे दारू अड्डे होते. येथे सुरू असणाऱ्या गावठी दारूच्या भट्टीकडे पोलिसांचे दुर्लक्ष होते.
पुण्यात महिलांकडून गावठी दारूअड्डा उध्वस्त
खडकवासला धरणाजवळ असलेल्या लमाण वस्ती आणि लांडगे वस्ती येथे अनेक दिवसांपासून हे दारू अड्डे होते. येथे सुरू असणाऱ्या गावठी दारूच्या भट्टीकडे पोलिसांचे दुर्लक्ष होते. हे दारू अड्डे बंद करण्यात यावे यासाठी स्थानिक महिलांनी पोलिसांना निवेदनही देण्यात आले होते, पण कोणतीच कारवाई करण्यात आली नव्हती. आज अखेर महिलांनी आक्रमक पवित्रा घेत दारूचे ड्रम फोडले आणि हे अड्डे बंद पाडले.