महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडला स्मार्ट सिटी करण्यात शहरवासीयांचे योगदान महत्वपूर्ण - उषा ढोरे - महापौर उषा ढोरे

पिंपरी चिंचवडसारख्या औद्योगिक नगरीला स्मार्ट सिटी करण्यासाठी शहरवासीयांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या शहराला देशातील सर्वोतम वैभवशाली शहर बनवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने साथ द्यावी, असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी केलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थापनेच्या ३८व्या वर्धापन दिनानिमित्त महापौर ढोरे यांनी शहरवासियांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.

Pimpri-Chinchwad
पिंपरी चिंचवड महापालिकेचा 38 वा वर्धापन दिन

By

Published : Oct 11, 2020, 5:45 PM IST

पिंपरी चिंचवड (पुणे) -पिंपरी चिंचवड सारख्या औद्योगिक नगरीला स्मार्ट सिटी करण्यासाठी शहरवासियांचे महत्वपूर्ण योगदान आहे. या शहराला देशातील सर्वोतम वैभवशाली शहर बनवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने साथ द्यावी, असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी केले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थापनेच्या ३८व्या वर्धापन दिनानिमित्त महापौर ढोरे यांनी शहरवासीयांना शुभेच्छा दिल्या. कोरोना विषाणू संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर महापालिका स्थापनेचा वर्धापनदिन साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी शहराच्या जडणघडणीचे शिल्पकार असलेले दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात असलेल्या पुतळयास महापौर ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोढ, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, पदाधिकारी योगेश रसाळ, अमित जाधव, शुभांगी चव्हाण, सुप्रिया सुरगुडे, धनाजी नखाते, रणजित भोसले, अविनाश तिकोणे, मंगेश कोंढाळकर, तुकाराम गायकवाड, कविता सातपुते, सामाजिक कार्यकर्ते गुलाब पानपाटील, संभाजी बारणे, उमेश गवळी, तुषार काळभोर, निलेश घुले आदीसह कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहराला उद्योगनगरी म्हणून ओळखले जाते. येथील कष्टकरी कामगार हा या शहराचा पाठीचा कणा असल्याचे नमूद करुन महापौर ढोरे म्हणाल्या की, इथल्या उद्योगधंदयांनी शहराच्या विकासात भर घातली. अल्पावधीत विकासाचे विविध टप्पे पार करणा-या या शहराने विविध पुरस्कार प्राप्त केले आहेत. उत्तम पायाभूत सुविधा, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बलांसाठी तसेच शहर झोपडपट्टीविरहित व्हावे यासाठी परवडण्यायोग्य घरे, मेट्रो प्रकल्प, प्रशासकीय कामात ऑनलाइन पद्धतीचा वापर, दळण - वळणासाठी रस्ते, पूल, क्रीडांगणे, उद्याने, विविध योजना महापालिकेच्या माध्यमातून निरंतर राबविल्या जात आहेत. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना राबवित असून नागरिक देखील आपल्या परीने योगदान देत आहेत. कोरोना साथीचे संकट दूर करण्यासाठी आपले सांधिक प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी महापौर ढोरे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details