पुणे - राज्यातील सरासरी तापमानात किंचित वाढ झाली आहे. त्यामुळे उन्हाचा पारा वाढला आहे. अहमदनगर, मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट आली आहे. येत्या काही दिवसात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
यंदाचा उन्हाळा आग ओकणार..., तापमान सरासरीपेक्षा जास्त असल्याची पुणे वेधशाळेची माहिती
मात्र, महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये तापमान सरासरीपेक्षा किंचित अधिक राहण्याची शक्यता आहे. सध्या अहमदनगर, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंदवण्यात आले आहे.
प्रतिकात्मक छायाचित्र
पुणे वेधशाळेचे हवामान तज्ज्ञ डॉ. अनपम काश्यपी यांनी ही माहिती दिली. या माहितीनुसार, यंदा उन्हाळ्यामध्ये तापमानात कुठलाही मोठा बदल अपेक्षित नाही. मात्र, महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये तापमान सरासरीपेक्षा किंचित अधिक राहण्याची शक्यता आहे. सध्या अहमदनगर, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंदवण्यात आले आहे.