पुणे:आज सासवड येथील दिवे घाटात एका टँकर चालकाने दोन दुचाकी स्वरांना धडक देत पलटी होऊन अपघात झाला आहे.या धडकेत एक दुचाकी स्वार आणि टँकर चालक याच जागीच मृत्यू झाला असून जखमी दोन जणांना सासवड येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस तसेच अग्निशमन दलाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
टॅंकर दरीत कोसळला:आज साडेसात वाजल्याच्या सुमारास एक टँकर दिवे घाट उतरत असताना टँकर वरील चालकाचा ताबा सुटल्याने टँकर चालकाने दोन दुचाकी स्वरांना धडक दिली.हा टँकर सासवड वरून हडपसरच्या दिशेला येत होता. तेव्हा दिवे घाटातील शेवटच्या वळणावर उताराला असताना टँकर वाहनांना धडक देत दरीत कोसळला आहे.
ट्रेलर आणि गॅस टँकरचा भीषण अपघात: अजमेरमध्ये राष्ट्रीय महामार्ग 8 वर ट्रक आणि एलपीजी टँकर यांच्यात झालेल्या धडकेने मोठा आगडोंब उसळला होता. आगीच्या ज्वाळा दूरवरून दिसत होत्या आणि काही वेळातच 3 जण जळून राख झाले, तर 1 जळालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
धडकेसोबतच मोठा स्फोटही: गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला. काही वेळातच सुमारे ५०० मीटरचा परिसर आगीच्या गोळ्यात बदलला. एलपीजी इंधनाने भरलेला गॅस टँकर मार्बलने भरलेल्या ट्रकला धडकल्याचं सांगण्यात येत आहे. या धडकेसोबतच मोठा स्फोटही झाला. दोन्ही चालकांना पळून जाण्याची संधीही मिळाली नाही आणि ते जळून राख झाले. त्याचवेळी सुमारे 500 मीटर अंतरावर उभा असलेला ट्रकही या आगीत खाक झाला. या वेदनादायक अपघातात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सीएम गेहलोत यांचे ट्विट:राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करून या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. चिरंजीवी अपघात विमा योजनेच्या माध्यमातून पीडितांना मदत करण्याबाबत त्यांनी आपल्या संदेशात सांगितले आहे. गेहलोत म्हणाले की, 'बेवार (अजमेर) येथील NH-8 वर झालेल्या अपघातात लोकांचा मृत्यू आणि जखमी झाल्याची माहिती दुःखद आहे. शोकाकुल परिवारातील सदस्यांप्रती माझ्या मनापासून संवेदना, देव त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो आणि दिवंगत आत्म्यांना शांती देवो. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री चिरंजीवी अपघात विमा योजनेंतर्गत मदत दिली जाईल.'
हेही वाचाःAjit Pawar on CM Eknath Shinde : नुसती स्ट्रॉबेरी बघून शेती होते का? अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल