महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तमाशाची पंढरी असणाऱ्या नारायणगावात रंगली यात्रा; तमाशा शौकीनांची गर्दी

नारायणगाव येथील ग्रामदैवत मुक्ताई देवी व काळोबा देवस्थानची यात्रा १ मे पासून सुरू झाली आहे. तमाशा फडमालकांच्या हजेरीने ही यात्रा तब्बल ८ दिवस यात्रा रंगते.

तमाशाची पंढरी म्हणुन ओळख असणा-या नारायणगावात यात्रा रंगली

By

Published : May 4, 2019, 3:12 PM IST

Updated : May 4, 2019, 8:31 PM IST

पुणे- जिल्ह्यातील नारायणगाव हे तमाशा कलावंतांची पंढरी म्हणून ओळखले जाते. तमाशा सम्राज्ञी आणि फडमालक दिवंगत विठाबाई भाऊ मांग या देखील याच गावातील आहेत. येथील ग्रामदैवत मुक्ताई देवी व काळोबा देवस्थानची यात्रा १ मे पासून सुरू झाली आहे. तमाशा फडमालकांच्या हजेरीने ही यात्रा तब्बल ८ दिवस यात्रा रंगते. यात्रेला आणि येथील फुक्कट तमाशाच्या बारीला अनेक तमाशा शौकीन गर्दी करत आहेत.

येथे कोणतेही मानधन न घेता तमाशा होतो. या ठिकाणी जी बारी वरचढ ठरते त्या बारीला राज्यभर मागणी असते. शिवाय बिदागी पण चांगली मिळते. यात्राकाळात रोज रात्री १०च्या नंतर नामांकित फडमालक आपल्या तमाशा-बारीचे सादरीकरण करतात. कलावंतांचा मोठा संच, विद्युत रोशनाई, मिमिक्री, लावण्यांसोबतच हिंदी मराठी ऑर्केस्ट्रातील गाण्याची बेधुंद गाणी, एक से बढकर एक नर्तकींच्या ठेक्यावर येथे रात्र बहरते. याठिकाणी तमाशाफड मालकांना, कलावंताना आणि यात्रेकरूंना सर्व सोयी मोफतपणे उपलब्ध करून दिल्या जातात.

यात्रोत्सवात ढोलताशा पथकांच्या गजरात घागरींची आकर्षण मिरवणुकीत निघते. परिसरातील नामांकित ढोलताशा पथके मिरवणुकीत सहभागी होतात. यात्रेनिमित्त एलईडी दिव्यांचा वापर करून नेत्रदीपक विद्युतरोषणाई करण्यात येते. तसेच शोभेच्या दारुकामासाठी ही यात्रा प्रसिद्ध आहे. मागील ४० वर्षापासून हे शोभेचे दारूकाम या यात्रेचे आकर्षण ठरत आहे. नारायणगाव येथील "मुस्लिम कुटुंबातील आतार आणि मनियार बंधू" दरवर्षी मोफत पणे ही सेवा ते या ठिकाणी सादर करतात. राज्यातील सर्वात मोठी आणि तमाशा कालावंतांच्या माहेरघरातील तमाशाची ही यात्रा आपल्या परंपरा जपत हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन करुन देत आहे.

Last Updated : May 4, 2019, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details