पुणे - गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा होत असताना मावळमध्ये तीन तलवारी दोन चॉपरसह गुन्हेगाराला तळेगाव पोलिसांनी अटक केली. पिंपरी-चिंचवड शहरात गणेशोत्सवाचा सण शांततेत तसेच कायदा व सुव्यवस्थेचा भंग न होता पार पडावा यासाठी योग्य ती काळजी घेतली जात आहे.
ऐन गणेशोत्सवात तीन तलवारी व दोन चॉपरसह गुन्हेगाराला तळेगाव पोलिसांनी केले जेरबंद हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमधील वेगवेगळ्या कारवाईत २ लाख ४५ हजार रूपयांच्या आठ दुचाक्या जप्त
शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांच्याकडून सूचना देण्यात आल्या आहेत. तळेगाव शहर पोलिसांनी अनुचित प्रकार रोखण्यासाठी शहरात वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या आहेत. त्यातच तळेगाव दाभाडे येथील शिवाजी चौकात एक सराईत गुन्हेगार तीन तलवार व दोन चॉपर घेऊन येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून गुन्हेगार अनिल गुणवंत म्हस्के (वय 30) ताब्यात घेतले. गुन्हेगाराजवळील शस्त्र जप्त केले असून तळेगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नेमका काय कट रचला होता का? या प्रश्नाचा शोध आता पोलीस घेत आहेत.
हेही वाचा - पुणे-नागपूर बसला आग, सर्व प्रवासी सुरक्षित
हेही वाचा - शिरुर तालुक्यात चोरांचा धुमाकूळ; एका गावातील ४ दुकाने फोडली तर एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला