महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एचसीएमटीआर मार्गावर नियो मेट्रो करा; देवेंद्र फडणवीसांची पुणे महापालिकेला सूचना

पुणे महापालिकेतर्फे मध्यवर्ती भागातील वाहतुकीसाठी 'पुण्य दशम' या बससेवेचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी महात्मा फुले मंडई येथे झाले. यावेळी उच्च द्रुतगती उन्नत मार्गावर (एचसीएमटीआर) नियो मेट्रोचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा अशी सूचना त्यांनी यावेळी केली आहे.

Take Neo Metro on HCMTR route
एचसीएमटीआर मार्गावर नियो मेट्रो करा

By

Published : Jul 10, 2021, 9:45 AM IST

पुणे -मेट्रो आणि पीएमपीएमएल बससेवा इंटिग्रेटेड होणार आहे. त्यामुळे एकाच तिकीटात कोणत्याही पद्धतीने प्रवास करता येईल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुलभ असेल तर नागरिकांकडून त्यास प्रतिसाद मिळतो. उच्च द्रुतगती उन्नत मार्गावर (एचसीएमटीआर) नियो मेट्रोचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविल्यास त्यासाठी निधी उपलब्ध होईल, अशी सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिकेला दिली आहे.

'पुण्य दशम' बससेवेचे लोकार्पण

'पुण्य दशम' बससेवेचे लोकार्पण -

पुणे महापालिकेतर्फे मध्यवर्ती भागातील वाहतुकीसाठी 'पुण्य दशम' या बससेवेचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महात्मा फुले मंडई येथे शुक्रवारी करण्यात आले. यावेळी भापजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, आमदार सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर सुनिता वाडेकर आदी यावेळी उपस्थित होते.

नागरिकांच्या सोयीसाठी अॅप सुरु करावी -

१० रुपयात कुठेही प्रवास करता येईल ही योजना कल्पक आहे. यामुळे प्रदूषण, वाहतूक कोंडी कमी होईल. नागरिकांना बसची माहिती मिळावी यासाठी अॅप सुरू करावे. देशात सर्वाधिक इलेक्ट्रीक बसेस पुण्यात वापरल्या जातात. चांगल्या सुविधा देऊन लोकांना सार्वजनिक वाहतुकीची सवय लावली पाहिजे, असे यावेळी फडणवीस म्हणाले.

यंदा निवडणुकीत 105 च्या पुढे नगरसेवक निवडून येतील -

सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू केले. पण त्यावर भाजपचे कमळ नाही, तरीही काही जण लस घेणार नाही म्हणाले. आता पुण्यात होणारी मेट्रो मोदीची आहे, असे म्हणून बसणार नाही का? असा टोला भाजपा खासदार गिरीश बापट यांनी विरोधकांना लगावला. पुढच्या महापालिका निवडणुकीत भाजपचे १०५ च्यापुढे नगरसेवक निवडून येतील. विरोधकांना १०० उमेदवार देखील मिळणार नाही, अशी टीकाही यावेळी बापट यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details