पुणे -पुण्यात कर्णबधिरांच्या मोर्चावर झालेल्या लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निषेध व्यक्त केला आहे. कर्णबधीर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अथवा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी खासदार सुळे यांनी केली आहे.
कर्णबधीर लाठीचार्ज : निंदनीय व लाजिरवाणी घटना, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - सुप्रिया सुळे - ncp
आपल्या न्याय मागण्यांसाठी अत्यंत शांततेत मोर्चा काढणाऱ्या कर्णबधीर तरुणांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला आहे. ही अत्यंत निंदनीय आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

पुणे जिल्ह्यातील कर्णबधीर तरुण तरुणींनी आपल्या काही मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. बोलूही न शकणारे हे तरुण अत्यंत शांतपणे आपल्या मागण्या घेऊन शासन दरबारी आले होते. त्यांच्यावर लाठीहल्ला करण्याइतपत पोलिसांची मजल जातेच कशी? या राज्याला सक्षम गृहमंत्री असावा, अशी आमची पहिल्यापासूनची मागणी आहे. ते वारंवार खरे ठरत आहे. शांतपणे मोर्चा काढणाऱ्या मुलांनी असा कोणता गोंधळ घातला, की ज्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री पूर्णतः अयशस्वी ठरले आहेत. त्यांनी आजच्या प्रकारानंतर तातडीने राजीनामा द्यायला हवा, अशी खरमरीत टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.