पुणे - मावळ लोकसभा मतदार संघातून आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांच्या नावाची कुठलीही चर्चा नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुनील तटकरे यांनी सांगितले आहे. आज अलिबाग येथे ते पत्रकारांशी बोलत होते.
मावळ मतदारसंघासाठी स्मिता पाटील यांच्या नावाची चर्चा नाही - सुनील तटकरे - राष्ट्रवादी काँग्रेस
पार्थ पवार यांनी निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यासंदर्भात येत्या २ ते ४ दिवसात निर्णय होईल असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
सुनील तटकरे, सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस
गेल्या २ दिवसांपासून स्मिता पाटील यांच्या नावाची चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे. त्या मावळ मतदार संघात पिंपरी चिंचवड येथे राहत असल्या तरी त्यांच्या नावाची चर्चा पक्षात झालेली नाही. पार्थ पवार यांनी निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यासंदर्भात येत्या २ ते ४ दिवसात निर्णय होईल असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
Last Updated : Mar 6, 2019, 11:42 PM IST