पुणे - निसर्ग चक्रीवादळामुळे कालपर्यंत थांबलेला मान्सूनचा प्रवास आजपासून पुन्हा वेगात सुरू झाला आहे. चक्रीवादळ शमताच अरबी समुद्रात मान्सूनसाठी पोषक असलेली आद्रता निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून वेळेवर येण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
निसर्ग चक्रीवादळ शमल्यानंतर महाराष्ट्रात मान्सूनसाठी पोषक वातावरण - महाराष्ट्र मान्सून अपडेट
निसर्ग चक्रीवादळ शमताच अरबी समुद्रात मान्सूनसाठी पोषक असलेली आद्रता निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून वेळेवर येण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पाऊस
मान्सून आज कारवारपर्यंत पोहोचला असून साधारण 8 तारखेपर्यंत गोवा आणि तळ कोकणाच्या किनारपट्टीला धडक मारेल. दरम्यान, बंगालच्या उपसागरात मात्र, अजूनही पोषक वातावरण निर्माण झाले नसल्याने त्याबाजूला मान्सून काहीसा विलंबाने येऊ शकतो, असा अंदाज पुणे वेधशाळेचे प्रमुख संशोधक डॉ. अनुपम कश्यपी यांनी वर्तवला आहे.