महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'जेएनयू' हल्ल्याचा पुण्यात विद्यार्थ्यांकडून निषेध

रविवारी रात्री जेएनयुमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला. 60 हून अधिक गुंड चेहरा झाकून विद्यापीठात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात पंधराहून अधिक विद्यार्थी जखमी झाले होते. या घटनेनंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या विद्यार्थी संघटनांकडून एकमेकांवर आरोप केले जात आहेत.

Students agitation in Pune
पुणे

By

Published : Jan 7, 2020, 8:42 AM IST

पुणे- जेएनयुमध्ये रविवारी झालेल्या हल्ल्याचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात निषेध करण्यात आला. विविध विद्यार्थी संघटनानी एकत्र येत हे आंदोलन केले. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. एनएसयुआय सोबत 30 विविध संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

'जेएनयू' हल्ल्याचा पुण्यात विद्यार्थ्यांकडून निषेध

हेही वाचा - मध आणि त्यापासून होणाऱ्या विविध पदार्थांसाठी देशभरात 'हनी क्लस्टर' उभारणार - नितीन गडकरी

रविवारी रात्री जेएनयुमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला. 60 हून अधिक गुंड चेहरा झाकून विद्यापीठात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात पंधराहून अधिक विद्यार्थी जखमी झाले होते. या घटनेनंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या विद्यार्थी संघटनांकडून एकमेकांवर आरोप केले जात आहेत.

हेही वाचा - 'दोस्ती तर आहे आमची राईट, पण मॅटवर गेल्यावर चुरशीची होईल फाईट'

या घटनेचा देशभरात निषेध करण्यात येत आहे. याचा घटनेचा सोमवारी पुण्यात विविध ठिकाणी निषेध करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संध्याकाळी 7 च्या सुमारास निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो विद्यार्थी विद्यापीठातील अनिकेत कॅन्टीनजवळ जमले होते. विद्यार्थ्यांनी विविध घोषणा यावेळी दिल्या. तसेच केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांवर दडपशाही सुरू असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details