पुणे- संचारबंदीनंतर काही अटी-शर्तीवर बाजारपेठा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र अशातच आता शिरूर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढून एका रुग्णांची भर पडली. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून संचारबंदी पुन्हा कडक करत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण शिरूर शहर आज बंद ठेवण्यात आले. पुढील पाच दिवस असाच कडक बंद केला जाणार असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.
आता कोरोनाचे लोण ग्रामीण भागात; शिरूर परिसरात कडकडीत बंद - कोरोना संसर्ग
शिरूर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढून एका रुग्णांची भर पडली. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून संचारबंदी पुन्हा कडक करत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण शिरूर शहर आज बंद ठेवण्यात आले.
कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शिरूर शहर व परिसरात कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. घराबाहेर कोणीही पडू नका, असे आवाहन करण्यात आले.
विनाकारण कोणी नागरिक बाहेर पडला, तर अशा नागरिकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. पुण्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असताना नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, आरोग्याबाबत तातडीने तपासणी करुन घेणे, प्रवास टाळणे असे आवाहन शिरूर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.