महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भोसरी पोलिसांची तुफान कामगिरी; 18 लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी-चिंचवडमध्ये विनापरवाना पिस्तुल बाळगणाऱ्या तीन जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून तीन पिस्तुल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई भोसरी पोलिसांनी केली आहे. याशिवाय 24 दुचाक्या देखील जप्त केल्या असून, एकूण 18 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

भोसरी पोलिसांची तुफान कामगिरी; 18 लाखांचा मुद्देमाल जप्त
भोसरी पोलिसांची तुफान कामगिरी; 18 लाखांचा मुद्देमाल जप्त

By

Published : Jun 4, 2021, 5:21 AM IST

पिंपरी-चिंचवड - पिंपरी-चिंचवडमध्ये विनापरवाना पिस्तुल बाळगणाऱ्या तीन जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून तीन पिस्तुल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई भोसरी पोलिसांनी केली आहे. याशिवाय 24 दुचाक्या देखील जप्त केल्या असून, एकूण 18 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. गोल्डमॅन दत्ता फुगे यांच्या खुनाचा गुन्ह्यातील आरोपीचा यात सहभाग आहे. त्याला देखील बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

12 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या कामगिरीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलासे यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी सुमित देवकर यांनी संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांच्याकडून 12 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणी चार जणांना अटक केली. राहुल गणेश पाटील, अक्षय बब्रुवान खोसे, गणेश बबन जानराव अशी अटक केलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

9 लाखांच्या दुचाक्या पकडल्या; अल्पवयीन मुलगा ताब्यात

दुसऱ्या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे हे त्यांच्या पथकासह गस्त घालत होते. तेव्हा, वाहन चोरी करणाऱ्या आरोपीसह अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. अर्षद हनिफ सय्यद, अनिकेत सचिन झेंडे यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं असून, त्यांच्याकडून 12 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्याची किंमत 9 लाख 10 हजार येवढी आहे.

शस्त्राचा धाक दाखवून लुटणारा जेरबंद

तिसऱ्या कारवाईत, कासारवाडी आणि दापोडी परिसरात रात्रीच्या वेळी गाड्या अडवून हत्याराचा धाक दाखवून लुटणाऱ्या व्यक्तीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. राजू बैजू नेटके, सागर साजु नायर, सिद्धार्थ उर्फ भाव्या अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. त्यांच्याकडून चार जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई पोलीस कर्मचारी सागर जाधव यांनी केली आहे.

विनापरवाना पिस्तुल बाळगणारे अटक

चौथ्या कारवाईमध्ये विनापरवाना पिस्तुल बाळगणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलीस कर्मचारी गणेश सावंत यांनी केली आहे. प्रसन्ना उर्फ सोनू ज्ञानेश्वर पवार, अंकुश उर्फ तात्या रंगनाथ डांगे, प्रमोद उर्फ कक्का संतराम धौलपूरिया अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रमोद हा गोल्डन मॅन दत्ता फुगे याच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. अशा ऐकून 18 लाख 95 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर अवताडे आणि गुन्हे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details