पुणे -चाकण औद्योगिक वसाहतीमधील बीरदवडी येथे एका वर्कशॉपमध्ये मालकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. हत्येचे कारण मात्र अस्पष्ट आहे. हरिश्चंद्र किसनराव देठे असे हत्या झालेल्या वर्कशॉप मालकाचे नाव आहे.
चाकणमधील बीरदवडी येथील व्ही.एच.डी. इंजिनिअरिंग नावाचे वर्कशॉप हरीश्चंद्र देठे चालवत होते. रोजच्या दैनंदिन वेळेप्रमाणे देठे वर्कशॉपमध्ये आले असताना वर्कशॉपच्या गेटवर एका व्यक्तीशी वाद झाला. त्यानंतर काही वेळात चार ते पाच जणांनी येऊन वर्कशॉपवर दगडफेक केली. दरम्यान, हरीश्चंद्र देठे वर्कशॉपच्या गेटवर येताच त्यांच्या डोक्यात दगड घालून निघृण हत्या करण्यात आली. त्यानंतर हल्लेखोर फरार आहेत. देठे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.