महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Kustigir Parishad: 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीला सुरुवात करा, जिल्हा संघाचे पत्र

Maharashtra Kustigir Parishad: महाराष्ट्र कुस्तीगार परिषदेच्या सरचिटणीस पदी बाळासाहेब लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे कोर्टाने दिल्यानंतर आता महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने जिल्हास्तरीय महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निवड चाचणीला सुरुवात करा, असे पत्र आता कुस्तीगार परिषदेने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना दिला आहे.

Wrestling Council
Wrestling Council

By

Published : Nov 17, 2022, 10:34 AM IST

पुणे: महाराष्ट्र कुस्तीगार परिषदेच्या सरचिटणीस पदी बाळासाहेब लांडगे यांची नियुक्ती कायम असून ती योग्य आहे. असा कोर्टाने दिल्यानंतर आता महाराष्ट्र कुस्तीजर परिषदेने जिल्हास्तरीय महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निवड चाचणीला सुरुवात करा, असं पत्र आता कुस्तीगार परिषदेने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना दिला आहे.

बाळासाहेब लांडगेंनी पत्रक काढले: महाराष्ट्रातील कुस्ती पैलवानांसाठी आणि कुस्तीशौकिनांसाठी मोठी बातमी असून 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीला सुरुवात करा, असं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेनं राज्यातील सगळ्या जिल्हा संघांना पत्र दिलं आहे. 10 डिसेंबरच्या आत निवड चाचणी घेऊन पैलवानांची यादी सादर करा, कुस्तीगीर परिषदेची सूचना दिल्या आहेत. बाळासाहेब लांडगेंनी पत्रक काढले आहे.

कुस्तीगीर परिषद ही बरखास्त करण्यात आली: राज्यात जिल्ह्यात लवकरच महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धा होणार आहे. महाराष्ट्र केसरी डिसेंबर अखेर होणार आहे. बाळासाहेब लांडगेच महाराष्ट्र केसरी भरवणार असून स्पर्धेवर महाराष्ट्र कुस्तीगर परिषद ठाम आहे. जिल्हा संघांना दिली पत्र त्याने त्या संदर्भात कळवले आहे. राज्यातील मानाची समजले जाणारे महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणी घ्यायची ? यावरून राज्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. कारण महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद ही बरखास्त करण्यात आली होती. आणि बाळासाहेब लांडगे यांची नियुक्ती ही रद्द करण्यात आली होती.

कुस्तीगीर परिषदेत महाराष्ट्र केसरीचे आयोजन:कोर्टाच्या निकालानंतर आता महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्यावर ठाम असून सर्व जिल्हा कुस्ती संघांना त्याने पत्र पाठवून 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे निवड चाचणी घ्यायला सुरुवात करा, असे पत्र दिले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेत महाराष्ट्र केसरीचे आयोजन करणार यावर ठाम आहे. येत्या डिसेंबरमध्ये महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details