पुणे - एक दिवसाच्या विश्रांतीनंतर शहरात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू झाली आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचले आहे. परिणामी विद्यापीठ रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता, कर्वे रस्ता, स्वारगेट, कोथरूड आदी शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली.
पुण्यात संततधार सुरूच, पावसामुळे वाहतुकीची कोंडी - धरणे
आज सुरू असलेल्या पावसामध्ये नागरिकांनी आपली चारचाकी वाहने बाहेर काढल्यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे.
आज सुरू असलेल्या पावसामध्ये नागरिकांनी आपली चारचाकी वाहने बाहेर काढल्यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे, खड्ड्यात साचलेले पाणी आणि त्यात संतंतधार पावसामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा वेग मंदावला आहे.
मागील काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे पुण्याच्या आसपास असलेल्या धरणक्षेत्रातील पाणीपातळीत वाढ झाली आहे. १ जूनपासून आतापर्यंत खडकवासला धरण परिसरात 365 मिलिमीटर पाऊस पडला आहे. सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत खडकवासला धरण अर्धे भरले आहे.