मुंबई- मद्यधुंद अवस्थेत एसटी बस चालवून प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या मुजोर चालकाची, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशानुसार एसटी प्रशासनाने तातडीने हकालपट्टी केली आहे. यापुढे देखील अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याला आपल्या नोकरीला कायमचे मुकावे लागेल, अशी कडक नियमावली प्रशासनाने राबवावी, असे निर्देश रावते यांनी प्रशासनाला दिले आहेत. ज्यामुळे, भविष्यात मद्यपान करून गैरवर्तन करणाऱ्यांना कायमचा आळा बसेल.
मद्यधुंद अवस्थेत एसटी बस चालवणाऱ्या मुजोर चालकाची हकालपट्टी! - मुंबई
यापुढे देखील अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याला आपल्या नोकरीला कायमचे मुकावे लागेल, अशी कडक नियमावली प्रशासनाने राबवावी. असे निर्देश परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी प्रशासनाला दिले आहेत.
ST driver who was drunk on duty has terminated from job
पुण्यातील शिवाजीनगर बसस्थानकावर अमोल चोले या एसटी चालकाने मद्यपान करून, बेकायदेशीररित्या एसटीच्या शिवशाही बसचा ताबा घेऊन, बेदरकारपणे सदर बस चालवून अपघात घडवला होता. संबंधित बस वाहकाच्या आणि प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.
या घटनेची गांभीर्याने दखल घेत दिवाकर रावते यांनी संबंधित चालकावर कडक कारवाई करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार पुण्याचे विभाग नियंत्रकांनी सदर चालकाला एसटीच्या सेवेतून बडतर्फ केले आहे.