पुणे- कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकून पडलेल्या परप्रांतीय मजूर, विद्यार्थी व इतर नागरिकांसह पुणे रेल्वे स्थानकाहून लखनऊकडे श्रमिक रेल्वे रवाना करण्यात आली. बाराशे प्रवाशांनी या श्रमिक रेल्वेच्या माध्यमातून उत्तर प्रदेशला प्रयाण केले.
पु्ण्याहून 1200 मजुरांना घेऊन श्रमिक रेल्वे लखनऊकडे रवाना
लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या उत्तर प्रदेशातील मजुरांना घेऊन श्रमिक रेल्वे पुणे स्थानकावरून लखनऊला रवाना झाली. या प्रवाशांच्या तिकिटांचा खर्चाची व्यवस्था काँग्रेसच्यावतीने करण्यात आली.
लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या परराज्यातील मजूर विद्यार्थी आणि नागरिकांसाठी श्रमिक रेल्वे या विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी परप्रांतीय मजुरांच्या रेल्वे तिकीटांचा सर्व खर्च उचलण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांनी पुढाकार घेऊन परप्रांतीय नागरिकांसाठीच्या रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन केले. यामुळे तिकीटासाठी एकही रुपया न देता या बाराशे मजुरांसाठी आपल्या या गावी परतण्याचा मार्ग खुला झाला.
शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पुणे स्टेशनहुन लखनऊला ही विशेष श्रमिक रेल्वे निघाली. संकटाच्या काळात आपल्या गावी परतण्याचा आनंद या प्रवाशांनी व्यक्त केला.