महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 23, 2020, 10:48 AM IST

ETV Bharat / state

लॉकडाऊननंतर पर्यटन व धार्मिक स्थळांच्या भेटीसाठी लालपरी सज्ज

प्रवाशांच्या सोयीसाठी आता बारामती आगारातून कोकण दर्शन, अष्टविनायक दर्शन, गाणगापूर दर्शनला जाण्यासाठी डिसेंबरअखेर गाड्या सुरू होणार आहेत.

लॉकडाऊननंतर पर्यटन व धार्मिक स्थळांच्या भेटीसाठी लालपरी सज्ज
लॉकडाऊननंतर पर्यटन व धार्मिक स्थळांच्या भेटीसाठी लालपरी सज्ज

बारामती-टाळेबंदीनंतर लाल परीने आता हळूहळू व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे. बारामती आगारातून पर्यटन व धार्मिक स्थळांसाठी विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. या गाड्यांमधून एसटीचे उत्पन्न वाढेल अशी अपेक्षा पुणे विभागाचे नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी व्यक्त केली.

प्रवाशांच्या सोयीसाठी आता बारामती आगारातून कोकण दर्शन, अष्टविनायक दर्शन, गाणगापूर दर्शनासाठी डिसेंबरअखेर गाड्या सुरू होणार आहेत. बारामती आगारातून कोकण दर्शन या मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी सध्या साधी बस सुरू करण्यात आली आहे. ही बस बारामती आगारातून सकाळी सात वाजता सुटून रात्री अकराला परतणार आहे. ही बस कोयना नगर डॅम गार्डन, डेरवन, संगमेश्वर, गणपतीपुळे, रत्नागिरी थिबा पॅलेस, सुरूबन बीच, भगवती किल्ला, मारलेश्वर आदी पर्यटन स्थळांना भेटी देणार आहे. २६ डिसेंबरपासून ही बस सेवा सुरू होणार असून प्रती प्रवासी १ हजार २० रुपये भाडे आकारण्यात येणार आहे

अष्टविनायक दर्शन...

अष्टविनायक दर्शन या मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी बारामती आगारातून साधी बस दोन जानेवारीपासून सुरू होणार आहे. ही बस बारामती आगारातून सकाळी सात वाजता सुटून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बारामतीत पोहोचणार आहे. अष्टविनायक दर्शनसाठी प्रति प्रवासी 930 रुपये तिकीट भाडे असणार आहे.

गाणगापूर दर्शन...

तर गाणगापूर दर्शनासाठी 28 डिसेंबरपासून आगारातून सकाळी नऊ वाजता गाडी सुटणार आहे. अक्कलकोट दर्शन करुन ही गाडी गाणगापूरला मुक्कामी राहिल आणि 29 डिसेंबर रोजी दत्त जयंती असल्याने दुपारी एक वाजता ही गाडी तिथून निघेल.



हेही वाचा-पुण्याच्या चार वर्षीय रुद्राणीने भैरवगड केला सर; हिरकणी म्हणून मिळाली नवी ओळख

हेही वाचा-नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकरी संकटात - कृषी अर्थतज्ञ डी. नरसिंह रेड्डी

ABOUT THE AUTHOR

...view details