पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांचेच सरकार सत्तेवर येईल, असे वाटत आहे. मात्र, त्यांना सांगा राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपचेच सरकार येणार आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पवार यांना लगावला. बारामती येथील जाचक बंगल्यात सुरू केलेल्या भाजप संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी ते बारामतीत आले होते. यावेळी बोलताना त्यांनी पवारांना खोचक टोला लगावला.
पवारांना सांगा पुन्हा युतीचेच सरकार येणार आहे; चंद्रकांत पाटलांचा टोला
गेल्या लोकसभेत महादेव जानकर यांच्या विजयासाठी 76 हजार मतांचा फरक पडला. जानकरांनी कमळ चिन्ह वापरले असते तर विजय निश्चित झाला असता. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कांचन कुल यांना कमळ चिन्ह देऊन उमेदवारी दिल्यावर निकालाच्या दिवशी पहिले दोन तास तर पवार छातीवर हात ठेवून सुप्रिया सुळे निवडून येतील, असे ठामपणे सांगू शकत नव्हते.
गेल्या लोकसभेत महादेव जानकर यांच्या विजयासाठी 76 हजार मतांचा फरक पडला. जानकरांनी कमळ चिन्ह वापरले असते तर विजय निश्चित झाला असता. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कांचन कुल यांना कमळ चिन्ह देऊन उमेदवारी दिल्यावर निकालाच्या दिवशी पहिले दोन तास तर पवार छातीवर हात ठेवून सुप्रिया सुळे निवडून येतील, असे ठामपणे सांगू शकत नव्हते. आम्हाला यावेळी सुद्धा यश आले नाही. यामुळे नाउमेद न होता कुठे कमी पडलो, काय वाढवावे लागेल, याचा अभ्यास करून 2024 ची बारामती लोकसभेची जागा खेचून आणण्याचा तसेच आगामी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.