महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे विभागातील 60.93 टक्के रुग्ण कोरोनामुक्त, 4 हजार 275 जणांवर उपचार सुरु

पुणे विभागातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12 हजार 418 इतकी आहे. यातील 7 हजार 566 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्या 4 हजार 275 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. याशिवाय आतापर्यंत 577 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

recovered  corona patients in pune division
पुणे विभागातील 60.93 टक्के रुग्ण कोरोनामुक्त

By

Published : Jun 8, 2020, 7:59 PM IST

पुणे- विभागातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12 हजार 418 इतकी आहे. यातील 7 हजार 566 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्या 4 हजार 275 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. याशिवाय आतापर्यंत 577 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 60.93 टक्के असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

कोरोनाबाधितांमध्ये पुणे जिल्हयातील 9 हजार 651 रुग्ण असून जिल्ह्यातील 6 हजार 53 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, सध्या 3 हजार 178 रुग्णांवर उपचार सुरु आहे. जिल्ह्यातील एकूण 420 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 234 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 62.72 टक्के आहे.

सोमवारी पुणे विभागातील कोरोना रुग्णांच्या संख्येत एकूण 204 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 128, सातारा जिल्ह्यातील 10, सोलापूर जिल्ह्यातील 32, सांगली जिल्ह्यातील 19 तर कोल्हापूर जिल्ह्यातील 15 रुग्णांचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यात सध्या 631 कोरोनाबाधित रुग्ण असून 331 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 272 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 295 कोरोना रुग्ण असून 666 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 514 जणांवर उपचार सुरु आहे. सांगली जिल्ह्यात 161 कोरोनाबाधित असून 90 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 65 जणांवर उपचार सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 680 कोरोना रुग्ण असून 426 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 246 जणांवर उपचार सुरु आहेत.

आजपर्यत पुणे विभागामधील एकूण 1 लाख 1 हजार 633 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 98 हजार 257 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर, 3 हजार 376 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 85 हजार 658 नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 12 हजार 418 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details