महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोंढवा भिंत दुर्घटनेला जबाबदार कोण? पालिका प्रशासन की बिल्डर? - पालिका प्रशासन

घटनास्थळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पाहणी केली आहे. या घटनेत बिल्डर, कंत्राटदारांचा निष्काळजीपणा भोवला असल्याचे दिसते मात्र या घटनेची संपूर्ण चौकशी करू, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

कोंढवा भिंत दुर्घटनेला जबाबदार कोण?

By

Published : Jun 29, 2019, 9:28 AM IST

पुणे - कोंढवा परिसरात इमारतीची संरक्षण भिंत कोसळून 15 जणांचा नाहक बळी गेला. या घटनेतील मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. हे सर्व कामगार बिहार येथील असून इमारत बांधकामासाठी ते पुण्यात आले होते. त्यामुळे या घटनेला पालिका प्रशासन जबाबदार आहे, की बिल्डर? याचे उत्तर मात्र अनुत्तरित आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा जीव एवढा स्वस्त झाला आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

या घटनेस जेवढे जबाबदार पालिका प्रशासन, तेवढीच जबाबदारी बिल्डरांचीदेखील आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई होणार, की इतर घटनांप्रमाणेच या घटनेकडे प्रशासन कानाडोळा करणार, हे पाहणे महत्तवाचे असेल.

मध्यरात्रीच्या सुमारात ही घटना घडली आहे. पोलीस, एनडीआरएफ आणि महापालिका प्रशासन यांच्याकडून बचावकार्य सुरू आहे. आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यात सुरू असणाऱ्या पावसाने इमारतीजवळील जमीन भुसभुशीत झाली त्यामुळे संरक्षक भिंत कोसळली.

घटनास्थळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पाहणी केली आहे. या घटनेत बिल्डर, कंत्राटदारांचा निष्काळजीपणा भोवला असल्याचे दिसते मात्र या घटनेची संपूर्ण चौकशी करू, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

पुण्यात याआधीही संरक्षक भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या असतानाही पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे या घटनेनंतर स्पष्ट झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details