महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कुसेगाव येथील श्री.भानोबा देव यात्रेला सुरुवात; दर्शनासाठी भाविकांची गर्दी - God-demon War Kussegaon Pune

शुक्रवारी श्री. क्षेत्र कुसेगाव येथील श्री. भानोबा देवाच्या यात्रेला सुरूवात झाली. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून कुसेगाव येथे देवाच्या दर्शनासाठी भाविकांनी हजेरी लावली.

pune
श्री.भानोबा देव यात्रा

By

Published : Dec 14, 2019, 9:47 AM IST

पुणे- शुक्रवारी (१३ डिसेंबर) श्री. क्षेत्र कुसेगाव येथील श्री. भानोबा देवाच्या यात्रेला सुरुवात झाली. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून कुसेगाव येथे देवाच्या दर्शनासाठी भाविकांनी हजेरी लावली. देव-दानवांमधील युद्ध हे या यात्रेचे खास आकर्षण होते.

माहिती देताना नागरिक आणि यावत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील

शुक्रवारी पहिल्या दिवशी ढोल ताशाच्या गजरात कोयाळीकर गजे पाहुणे यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भानोबा देव-दानवांबरोबर युद्ध खेळण्यासाठी मंदिरा बाहेर पडले. देव-दानव युद्धात अंदाजे ९०० दानवांचे मुडदे पडले होते. यावेळी देव-दानव युद्धाचा थरार पाहणाऱ्यांचे भानच हरपले होते. दरम्यान, भानोबा देव गेल्यानंतर मूर्च्छित होऊन पडलेल्या व्यक्तींच्या अंगावरून देवाला आलेला घाम शिंपडला जातो आणि त्यांच्या कानात भानोबाचे चांगभले म्हटल्यावर ते शुद्धीवर येतात. यात्रेनिमित्त देवाचा अभिषेक, ओलांडा, पोवाडा, कुस्त्या, लोकनाट्य अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू असल्याने अवघा कुसेगाव परिसर भक्तिरसात चिंब झाला आहे.

भानोबा देवाची आख्यायिका

भानोबा देव हे खेड तालुक्यातील कोयाळी येथे दुष्काळ असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे आपली गुरे चरण्यासाठी गेले होते. दरम्यान तेथे रामोशी व मातंग समाज यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले होते. यात भानोबा देवाचा वध करण्यात आला होता. याचाच बदला म्हणून यात्रा काळात रामोशी व मातंग समाजांच्या लोकांचे भानोबा देवाच्या यात्रेच्या पालखी काळात मुडदे पडतात. यावेळी पडलेले व्यक्ती दोन तास बेशुद्ध असतात. भानोबा देवाचा घाम बेशुद्ध पडणाऱ्या व्यक्तीवर टाकून कानामध्ये भानोबाच चांगभले बोलत त्यांना शुद्धीवर आणले जात असल्याचे गावकरी सांगतात. यात्रा काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, उपनिरीक्षक आर. घाडगे गोपनीय पोलीस सुजित जगताप, हवालदार संपत खबाले, संतोष मदने, काळे हे कुसेगाव येथे उपस्थित होते.

हही वाचा-पिंपरी-चिंचवडमध्ये कांदा फक्त ८० पैसे किलो, 'हे' आहे कारण

ABOUT THE AUTHOR

...view details