पुणे-नाशिक महामार्गावर शिवशाही बसला अपघात ; १० प्रवासी जखमी - शिवशाही बस बातमी
पुणे- नाशिक महामार्गावर कळंब येथे रविवारी(ता.२३) रात्री उशिरा नाशिकवरुन पुण्याला निघालेल्या शिवशाही बसचा अपघात झाला. शिवशाही बसमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.
शिवशाही बस अपघात
पुणे(राजगुरुनगर) - पुणे- नाशिक महामार्गावर कळंब येथे रविवारी(ता.२३) रात्री उशिरा नाशिकवरुन पुण्याला निघालेल्या शिवशाही बसचा अपघात झाला. शिवशाही बसमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. मात्र, अपघातात शिवशाही बस पलटी झाल्याने एक तास वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिक नागरिकांच्या मदतीने शिवशाही बसला बाजूला करण्यात यश आले. मात्र, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
Last Updated : Aug 24, 2020, 9:25 AM IST