महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

युती होईल तेव्हा होईल... पुण्यात मात्र शिवसेना इच्छुकाने फोडला प्रचाराचा नारळ - shivsen and bjp alliance

विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना पुण्यामध्ये युतीचा पेच निर्माण झाला आहे. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवाराने चक्क प्रचाराचा नारळ फोडला आहे. प्रचाराला सुरुवात केल्याने पुण्यातील राजकीय वातावरणात एकच चर्चा रंगली आहे.

युती होईल तेव्हा होईल... पुण्यात मात्र शिवसेना इच्छुकाने फोडला प्रचाराचा नारळ

By

Published : Sep 17, 2019, 11:49 PM IST

पुणे - भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाचा मुद्दा तसेच युती होणार की नाही याबाबत अजूनही स्पष्टता नसल्याने आता शिवसेनेच्या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवाराने चक्क प्रचाराचा नारळ फोडला आहे. प्रचाराला सुरुवात केल्याने पुण्यातील राजकीय वातावरणात एकच चर्चा रंगली आहे.

हेहा वाचा - 'इलाका हमारा-धमाका हमारा'; पालघरमधील गुंडागर्दी मोडून काढू - आदित्य ठाकरे

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी मंगळवारी पुण्यातल्या कसबा गणपती मंदिरात जाऊन प्रचाराचा नारळ फोडला. आजपासूनच (मंगळवारी) प्रचाराला सुरुवात करत आहोत असे जाहीर केले. या मतदारसंघात गेली २५ वर्षे भाजपचा उमेदवार आहे भाजपचे गिरीश बापट या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. मात्र, ते खासदार झाल्याने आता हा मतदारसंघ शिवसेनेकडे यावा अशी कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची भावना असल्याचे या नगरसेवकाने यावेळी सांगितले.

युती होईल तेव्हा होईल... पुण्यात मात्र शिवसेना इच्छुकाने फोडला प्रचाराचा नारळ

हेही वाचा - 'अजून म्हातारा झालो नाही, अनेकांना घरी बसवण्यासाठी बाहेर पडलोय'

२०१४ च्या निवडणुकीत ऐनवेळी युती फिस्कटली होती त्यामुळे प्रचाराला वेळ मिळाला नव्हता. यावेळी मात्र युतीचे काय होईल ते वरिष्ठ नेते ठरवतील. मात्र, जर युती झाली नाही तर वेळेवर गडबड नको म्हणून आतापासूनच प्रचाराला सुरुवात केली असल्याचे धनावडे यांनी सांगितले. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह कसबा गणपतीचे दर्शन घेतले प्रचाराचा नारळ फोडला आणि घरोघरी जाऊन प्रचार देखील सुरू केला युती झाली तर काय याबाबत बोलताना आतापर्यंत भाजपचा उमेदवार याठिकाणी होता. मात्र, आता कसबा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आला पाहिजेस, अशी आग्रही भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे आगामी काळात विधानसभा मतदारसंघावरून पुण्यात युतीमध्ये पीडा निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा - 'तुमचे बापजादे गुरुकुलात शिकत होते, त्यावेळी आमचे बापजादे मैला उचलत होते'

ABOUT THE AUTHOR

...view details