पुणे- शहरातील आठ विधानसभा मतदारसंघाच्या इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. यावेळी शिवाजीनगर मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार विजय काळे यांच्या विरोधातली नाराजी कार्यकर्त्यांनी उघडपणे पक्ष निरीक्षकांसमोर मांडली. यामुळे शिवाजीनगर मतदारसंघात भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
विद्यमान आमदारांना तिकीट देऊ नका, पुण्यात कार्यकर्त्यांची मागणी; भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर - vijay kale
शिवाजीनगर मतदारसंघातून सर्वाधिक तब्बल 51 इच्छुकांनी आपली नावे दिली होती. त्यातल्या 30 जणांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या. मात्र, खरेतर शिवाजीनगर मतदारसंघातून पाच ते सहा जणच मूळ इच्छूक आहेत.
शिवाजीनगर मतदारसंघातून सर्वाधिक तब्बल 51 इच्छुकांनी आपली नावे दिली होती. त्यातल्या 30 जणांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या. खरेतर शिवाजीनगर मतदारसंघातून पाच ते सहा जणच मूळ इच्छुक आहेत. मात्र, विद्यमान आमदारांच्या नाकर्तेपणाला विरोध म्हणून मोठ्या संख्येने इच्छुक म्हणून नावे दिल्याचे शिवाजीनगर मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले. विद्यमान आमदारांच्या विरोधातच निवेदन देखील पक्ष निरीक्षकांना यावेळी देण्यात आले. त्यांना पुन्हा उमेदवारी देऊ नका, असा आग्रह यावेळी कार्यकर्त्यांनी केल्याने शिवाजीनगर मतदारसंघातील भाजपची ही गटबाजी उफाळून आल्याचे दिसून आले.
दरम्यान, विद्यमान आमदार विजय काळे यांनी मात्र आपण कुणालाही अडवत नाही, ज्याला इच्छा आहे, त्याने मुलाखती द्याव्या पक्ष काय तो निर्णय घेईल, असे सांगत शिवाजीनगर मतदारसंघातून पुन्हा आपली दावेदारी दाखल केली. एकंदरीतच पुणे शहरामध्ये भाजपला मिळत असलेले घवघवीत यश पाहता इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शिवाजीनगर मतदारसंघासह कॅन्टोन्मेंट खडकवासला, हडपसर या मतदारसंघात सुद्धा विद्यमान आमदारांबाबत नाराजीचा सूर असून या जागांवर बदल करण्यात यावा, अशी मागणी होताना दिसत आहे.