पुणे- खेड तालुक्यातील रेटवडी गावात बिबट्याचा वावर वाढला आहे. खेड पंचायत समितीच्या शिवसेनेच्या सभापती सुभद्रा शिदे यांच्या घरी बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला चढवला. मात्र, आम्ही शिवसेनेचे वाघ आहोत, मग बिबट्याला काय घाबरायचं, असं म्हणत त्यांनी बिबट्याशी दोन हात केले आणि आपल्या शेळ्यांना वाचवले.
'आम्ही तर सेनेचे वाघ'; शेळ्यांना वाचविण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्या महिलेचा बिबट्याशी सामना - goats
सुभद्रा शिंदे यांच्या घराजवळ शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला. या बिबट्याचा सुभद्रा शिंदे यांनी प्रतिकार केला. त्यांनी गावकऱ्यांना धीर देऊन बिबट्याशी दोन हात केले व शेळ्यांना वाचवले.
माहिती देताना सुभद्रा शिंदे
मानव व बिबट्या यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. सुभद्रा शिंदे यांच्या घराजवळ शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला. या बिबट्याचा सुभद्रा शिंदे यांनी प्रतिकार केला. त्यांनी गावकऱ्यांना धीर देऊन बिबट्याशी दोन हात केले व शेळ्यांना वाचवले.