पुणे-पंढरपूर, देहू, आळंदी, तुळजापूर अशा ठिकाणी मी नेहमी दर्शनासाठी जातो. इथेही मी तसाच आलो आहे. यात माझा कोणताही राजकीय हेतू नाही. राजकारणात आम्ही आहोत म्हणजे अखंडपणे प्रसिद्धीशिवाय आम्हाला काही दिसत नाही, असा गैरसमज आहे, असे म्हणत शरद पवार यांनी निवृत्ती महाराज वक्ते यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे. ते आळंदीतील सदगुरु जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी महोत्सवात बोलत होते.
' मी पंढरपूरला दर्शनाला जातो.. पण त्याचे राजकारण करत नाही' - शरद पवार आळंदी बातमी
तेराव्या शतकापासून वारकरी परंपरा उदयास आली आहे.आदिनाथांपासून ते संत निवृत्ती महाराज यांनी वारकरी परंपरा जपली आहे. त्यांनी एक दिशा दाखवली आहे. आपण मोगलांचे आक्रमण पाहिले, ब्रिटिशांचे राज्य पाहिले, अनेक हल्ले पाहिले. मात्र, वारकरी संप्रदायावर याचा काही परिणाम झाला नाही असे पवार म्हणाले.
शरद पवार
हेही वाचा-'व्हॅलेंनटाईन डे'निमित्त मावळच्या गुलाबाची मागणी वाढली, १० दिवसात ८० लाखांचे उत्पन्न
तेराव्या शतकापासून वारकरी परंपरा उदयास आली आहे. आदिनाथांपासून ते संत निवृत्ती महाराज यांनी वारकरी परंपरा जपली आहे. त्यांनी एक दिशा दाखवली आहे. आपण मोगलांचे आक्रमण पाहिले, ब्रिटिशांचे राज्य पाहिले, अनेक हल्ले पाहिले. मात्र, वारकरी संप्रदायावर याचा काही परिणाम झाला नाही असेही पवार म्हणाले.
Last Updated : Feb 8, 2020, 3:14 PM IST