महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारामतीतील रुग्णांना शरद पवार यांनी दिले ४५० रेमडेसिवीर इंजेक्शन - शरद पवार

मागील दोन दिवसांपासून बारामतीत रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. ही बाब समजताच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बारामतीकरांसाठी तब्बल ४५० रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत उपलब्ध करून दिले.

Sharad Pawar
Sharad Pawar

By

Published : Apr 10, 2021, 9:54 PM IST

बारामती - बारामतीत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. दररोज २०० हून अधिक रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. पैकी अनेक रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता भासत आहे. मात्र मागील दोन दिवसांपासून बारामतीत रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. ही बाब समजताच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बारामतीकरांसाठी तब्बल ४५० रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत उपलब्ध करून दिले.

शरद पवार यांच्याकडून मिळालेल्या ४५० रेमडेसिवीर इंजेक्शनचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ गरजू रुग्णांना वाटप करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार प्राधान्यक्रम ठरवून सदर इंजेक्शन गरजूंना मोफत वाटप करण्यात आले. तुटवडा असणारे हे इंजेक्शन वेळेत व मोफत मिळाल्याने रुग्णांसह नातेवाईकांना दिलासा मिळाला असून त्यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

गेल्या आठवडाभरापासून बारामती शहरासह तालुक्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना संक्रमित रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शनची गरज भासत असल्याने बारामतीतील रुग्णालयांमध्ये या इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत होता. हे इंजेक्शन मिळवण्यासाठी नातेवाईकांना प्रचंड धावपळ करावी लागत होती. त्यातच रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचेही बोलले जात होते. अशावेळी मोफत रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध झाल्याने रुग्ण व नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details