पुणे :आम्ही कलाकार नाही, तरीदेखील आम्ही किती कलाकार आहोत, हे 15 महिन्यांपूर्वी तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय. त्यावर कोणी नाटक लिहलं तर बरं होईल, असं देखील उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दीड वर्षापूर्वी शिवसनेतून 40 आमदारांनी बंड केलं होतं. त्यानंतर त्यांनी भाजपासोबत राज्यात सत्ता स्थापन केली, असं सामंत यांनी म्हटलंय. ते आज पुण्यात १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात बोलत होते.
शरद पवारांचं पक्षविरहित राजकारण : यावेळी कार्यक्रमाचं उद्घाटन आयोजकांच्या हस्ते घंटा वाजवून करण्यात आलं. शरद पवार यांनी नाट्यसंमेलनात पक्षविरहित राजकारण केलं आहे. पक्षांतर्गत कितीही मतभेद असले, तरी सांस्कृतिक चळवळीला गालबोट लागता कामा नये, अशी भूमीका शरद पवारांनी घेतली, असं यावेळी बोलताना सामंत म्हणाले.
संमेलनासाठी 9 कोटींचा निधी :आज नाट्य संमेलनात सर्वजण वेगवेगळ्या पक्षातील आहेत. ही मातृसत्ताक संस्था आहे. त्यामुळं सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. राजकीय व्यासपीठ आणि नाट्य संमेलन वेगळं आहे. मात्र, सत्तेत आल्यावर आम्ही नाट्य संमेलनासाठी 9 कोटींचा निधी दिला आहे. वृद्ध कलाकारांसाठी वृद्धाश्रम असावा, असं विक्रम गोखले यांचं स्वप्न होतं. तो लवकरच पूर्ण होईल, असं सामंत म्हणाले. मराठी माणूस, मराठी रंगभूमी आपल्यासाठी महत्त्वाची असल्याचा उल्लेख देखील त्यांनी केलाय.
संमेलनाच्या अध्यक्षपदावरून वाद :नाट्य संमेलनात गटबाजी ठीक आहे, पण नाट्य परिषदेच्या निवडणुका थांबवायला हव्यात. निवडणुका कशा होतात, हे आम्ही पाहिलं आहे. नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदावरून वाद, टीका होत आहे. मात्र, मतप्रवाह आहे, यावर निर्णय घ्यावा लागेल, भांडण थांबलं पाहिजे. अध्यक्षपदावरून काय होते, असं उदय सामंत म्हणाले.
हेही वाचा -
- अजित पवारांच्या उपस्थितीत भाजपा आमदाराची दादागिरी, सुनील कांबळेंची पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण
- राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाचं वेळापत्रक ठरलं, दोन्ही गट मांडणार बाजू
- आधी तुमचं तुम्ही ठरवा, मगच 'वंचित'शी चर्चा करा; वंचित बहुजन आघाडीची स्पष्टोक्ती