महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ज्येष्ठ कलाकारांच्या मानधनात वाढ करावी, तिकीट दरात कपात व्हावी, शरद पवारांची मागणी - शरद पवारांची मागणी

Sharad Pawar Demands : नाटक हे ज्ञान आणि मनोरंजनाचे साधन आहे. निखळ मनोरंजन करणारी, आशयप्रधान आणि वास्तवावर भाष्य करणारी नाटकं व्हायला हवीत. तसंच ज्येष्ठ कलाकारांच्या मानधनात वाढ करावी, (honorarium of artists) तिकीट दरात कपात व्हावी अशी अपेक्षा १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.

Sharad Pawar Demands
शरद पवार

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 6, 2024, 5:33 PM IST

अ.भा. मराठी नाट्य संमेलनातील काही क्षण

पिंपरी–चिंचवड (पुणे)Sharad Pawar Demands :१०० वा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा औपचारिक उद्घाटन सोहळा आज पिंपरी-चिंचवड येथे पार पडला. (CM Eknath Shinde) या सोहळ्यात मावळते ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल यांना संमेलनाध्यक्षांची सूत्रे सुपूर्द केली. यावेळी स्वागताध्यक्ष शरद पवार म्हणाले, चित्रपटसृष्टी आधी हजारो वर्ष सर्वाधिक प्रभावी माध्यम ही रंगभूमी होती. मात्र आता जवळपास सर्व निर्माते, कलाकार हे हिंदी चित्रपटाकडे वळत आहेत. त्यामुळे मराठी रंगभूमी ओस पडत आहे. तसंच हल्ली डिजिटल माध्यमातही नाटकं सादर होतात. मात्र त्यामध्ये रंगभूमीचा जिवंतपणा नसतो असंही पवार यांनी सांगितलं.

देशाला शौर्यासोबत नाट्य व नृत्य, परंपरेचा इतिहास :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, देशाला ज्याप्रमाणे पुरातन मंदिरं आणि शौर्याचा इतिहास आहे, तसाच नाट्य आणि नृत्य परंपरेचा देखील इतिहास आहे. त्यामुळेच मराठी प्रेक्षक ओटीटी आणि सोशल मीडिया असताना देखील नाटकांना गर्दी करतात. राजकारणी चांगले कलाकार आहेत असं बोललं जातं. मात्र तुमची कला आमच्यापेक्षा अवघड आहे. राजकारणात कधी कधी धाडसी निर्णय घेतले जातात. दीड वर्षांपूर्वी सत्ता बदलाचा पहिला अंक झाला आहे. आता दुसरा अंक सुरू आहे. तर निवडणुकीच्या निकाला नंतर तिसरा अंक पार पडणार आहे. तसंच नाटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष बैठक घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.


बॅक स्टेज कलाकारांचाही विचार व्हावा :यावेळी मंत्रीउदय सामंत म्हणाले, शंभरावं नाट्य संमेलन होताना भाऊसाहेब भोईर यांनी माजी संमेलनाध्यक्षांची आठवण ठेवली हे कौतुकास्पद आहे. ज्या प्रमाणे उद्घाटन सोहळा होत आहे. त्याप्रमाणे उर्वरीत विभागीय संमेलनं व्हायला हवीत. मात्र, संमेलन होत असताना त्यावेळी बॅक स्टेज कलाकार, तंत्रज्ञान यांचा देखील विचार व्हायला पाहिजे.

नाटकांच्या दुरवस्थेवर उपाययोजना करावी :सिने कलाकार प्रशांत दामले म्हणाले, आम्हा कलाकारांसाठी नाट्य संमेलन दिवाळी असते. प्रत्येकजण नाटक, ओटीटी, सिनेमा यामध्ये काम करत असतो. मात्र सगळे यामधून वेळ काढून या संमेलनासाठी येतात. आमचे विचार व्यक्त करण्यासाठी ही योग्य जागा आहे. रसिक प्रेक्षकांनी पुढच्या पिढीला नाटक पाहण्याची सवय लावावी, अशी अपेक्षा यावेळी प्रशांत दामले यांनी व्यक्त केली. तसंच राज्यातील नाटकांच्या दुरवस्थेवर आणि गैरसोईवर, भाडेवाढीवर भाष्य करत त्यावर उपाय योजना करण्यासाठी दामले यांनी मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली.

विद्यापीठाच्या नाट्य विभागाला अनुदान द्यावे :१०० व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल म्हणाले, माझ्या आजवरच्या प्रवासात अनेक दिग्गजांचे योगदान आहे. नाट्यसृष्टीचे अनेक प्रश्न आहेत. आज प्रामुख्याने मी नाटकात येऊ इच्छित असलेल्या मुलांसाठीचा महत्त्वपूर्ण विषय मांडत आहे. राज्याच्या प्रत्येक विद्यापीठात नाट्य विभाग आहे; मात्र त्यांना त्यासाठीचा खर्च त्यांनीच उभा करायचा आहे. हा खर्च ५ ते ७ कोटी रुपयांचा आहे. प्रत्येक विद्यापीठाला तो झेपणारा नाही. यामुळे राज्य सरकारने प्रत्येक विद्यापीठाच्या नाट्य विभागाला अनुदान दिलं पाहिजे. तसंच इथे सादर होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नाटकांना सेन्सॉरशिप लावू नये, असं सांगितलं.

पिंपरीला उप सांस्कृतिक राजधानी मिळावी :नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर म्हणाले, मोरया गोसावींची ही भूमी आहे. २७ वर्ष काम केल्याचं १०० वं नाट्य संमेलन हे फळ आहे. पुणे ही सांस्कृतिक नगरी आहे; पण पिंपरीला उप सांस्कृतिक राजधानी मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. सर्वांच्या मदतीनं हे नाट्य संमेलन होत आहे. यावेळी लोक कलावंतांचं पुनर्वसन करावं, अशी मागणी भाऊसाहेब भोईर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली. तर नाट्य संमेलनाची स्मरणिका ‘नांदी’, नाट्य संमेलनाध्यक्ष पूर्वाध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांचं आत्मकथन ‘रंगनिरंग’ याचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. प्रास्ताविक अ. भा. म. नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष अजित भुरे यांनी केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी तर सतीश लोटके यांनी आभार प्रदर्शन केलं.

'या' मान्यवरांची उपस्थिती :संमेलनाला मान्यवरांसह आमदार उमा खापरे, आमदार अण्णा बनसोडे, आमदार श्रीरंग बारणे, उद्योगमंत्री उदय सामंत, अभिनेते मोहन जोशी, अशोक हांडे, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले हे उपस्थित होते. नाट्य संमेलनाच्या उद्‌घाटन सोहळ्याला अ. भा. म. नाट्य परिषद पिंपरी शाखेचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष सुरेशकुमार साकला, उपाध्यक्ष नरेश गडेकर, अ. भा. म. नाट्य परिषद कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी–चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह उपस्थित होते.

हेही वाचा:

  1. 'लक्षद्वीपला जाऊन स्वतःचे फोटो काढतात, हे महापुरुष मणिपूरला का जात नाहीत?' खरगेंचा मोदींना खोचक सवाल
  2. आव्हाडांनी संस्कृत वाचलं नसेल, अर्थाचा अनर्थ केला; कथाकार अनिरुद्धाचार्य यांची टीका
  3. लोकसभा निवडणुकीत 'इंडिया आघाडी' 400 जागांवर भाजपाला टक्कर देण्याच्या तयारीत, वाचा खास रिपोर्ट

ABOUT THE AUTHOR

...view details