पुणे- राज ठाकरे आणि माझ्यात भेटी झाल्या मात्र, त्यांना आघाडीत घेण्याबाबत आपण काहीही म्हटले नसल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केले. राज ठाकरेंना बारामतीमधून मार्गदर्शन मिळते, अशी टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पवारांनी मिश्किल उत्तर दिले. तसेच पेशवाईपासून छत्रपतींच्या काळापर्यंत बारामतीची हीच परंपरा असल्याचेही पवार म्हणाले.
पेशवाईपासून छत्रपतींच्या काळापर्यंत बारामतीची मार्गदर्शनाची परंपरा, पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
राज ठाकरेंना बारामतीमधून मार्गदर्शन मिळते म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला पवारांनी उत्तर दिले.
राज ठाकरेंना बारामतीमधून मार्गदर्शन मिळते म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला पवारांनी उत्तर दिले. आघाडीतील चर्चेबाबत मी फक्त स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सीपीएम पक्षासोबत चर्चा केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा सकारात्मक झाली आहे. त्यांच्या सुचनेनुसार त्यांना आम्ही जागा सोडल्या आहेत. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काँग्रेसकडून अपेक्षा आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्याशी मात्र, आपण चर्चा केली नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच अहमदनगर लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहील असेही पवार म्हणाले.