प्रतक्रिया देताना शैलेश टिळक व हेमंत रासने पुणे :टिळक कुटुंबियांमध्ये भारतीय जनता पार्टी उमेदवारी दिली पाहिजे, अशी अपेक्षा होती. पण उमेदवारी दिली गेली नाही, त्यानंतर आता या प्रतिक्रिया येत आहेत. कुणाल टिळक यांची प्रवक्ते पदी निवड झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी या ठिकाणी भेट देऊन त्यांची समजूत काढली होती. शनिवारी पक्षाने तिकीट दिले. परंतु पक्षाने आपल्याला तिकीट द्यावे, अशी अपेक्षा असताना ती अपेक्षा पूर्ण झाली नाही, अशी भावना शैलेश टिळक यांनी व्यक्त केली आहे.
रासने यांना भाजपची उमेदवारी :दरम्यान भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांनी शनिवारी मुक्ता टिळक यांचे दर्शन घेतले. त्यांना अभिवादन केले. टिळक कुटुंबाची त्यांनी भेट घेतली. शैलेश टिळक यांचे अभिनंदन केलेले आहे. मुक्ताताई आणि मी एकाच पक्षात काम केलेले कार्यकर्ते आहोत. आमचे कौटुंबिक नाते आहे. भारतीय जनता पार्टी म्हणून आमचे कुटुंब आहे. त्यामुळे पक्षाने दिलेला हा निर्णय आहे, त्याचे स्वागत शैलेश टिळक यांनी केली आहे, अशी भावना उमेदवार हेमंत रासने यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेल्या उमेदवाराबाबत नाराजीची चर्चा दिसत आहे.
ब्राह्मण आमदार असलेला मतदारसंघ : कसबा पोट निवडणूकीसाठी होणार्या मतदानासाठी भाजपाकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात एकमेव ब्राह्मण आमदार असलेला हा मतदारसंघ होता. या ठिकाणी ब्राह्मणांची सुद्धा लोकसंख्या खूप मोठी होती. त्या दृष्टीने या ठिकाणी तिकीट देणे अपेक्षित होते. निश्चितपणे ब्राह्मण मतदार नाराज होईल, परंतु तो भारतीय जनता पार्टीला मदत करेल. आम्ही सर्वजण हे हेमंत रासने यांना मदत करू, अशी भावना सुद्धा भावना शैलेश टिळक यांनी व्यक्त केली आहे.
उमेदवाराबाबत नाराजीची चर्चा : यावेळी बोलताना त्यांनी एक खंत मात्र मांडली आहे, की ज्याने ताईसोबत वीस पंचवीस वर्षे काम केले, त्या सर्वांनी ताईच्या योगदानाचा विचार करून त्यांनी आग्रह करायला पाहिजे होता की, त्यांच्या कुटुंबात तिकीट दिले गेले पाहिजे. या भावना व्यक्त करताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. टिळक कुटुंबाची मात्र भारतीय जनता पार्टीकडून दखल घेतली नसल्याची चर्चा आता पुण्यात सुरू आहे. या निवडणूकीकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
हेही वाचा : Prithviraj Chavan On Adani : अदानी समूहाच्या घोटाळ्याची आरबीआय, सेबीने चौकशी करावी - पृथ्वीराज चव्हाण