बारामती - पतीच्या मित्रानेच एका विवाहित महिलेच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बारामती शहरातील तांदूळवाडी येथील दादा पाटील नगर येथे घडली आहे. पीडित विवाहित महिलेच्या पतीनेच या घृणास्पद कृत्यासाठी त्याच्या मित्राला प्रोत्साहीत केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पतीसह त्याच्या मित्रावर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेखर सयाजी माळशिकारे ( रा. तांदूळवाडी ) व पीडीतेचा पती असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
Baramati Crime : महिलेच्या इच्छेविरुद्ध अत्याचार; पतीसह मित्रावर गुन्हा दाखल - बारामती महिला अत्याचार
विवाहित महिलेच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बारामतीमधून पुढे आली आहे. पीडित विवाहित महिलेच्या पतीनेच या घृणास्पद कृत्यासाठी त्याच्या मित्राला प्रोत्साहीत केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पतीसह त्याच्या मित्रावर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती पोलीस
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शेखर माळशिकारे हा ( दि.१७ ) रोजी रात्री संबंधित विवाहित महिलेच्या पतीसोबत त्याच्या घरी गेला होता. त्यावेळी या विवाहितेच्या पतीने त्याला पत्नीशी संभोग करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यावर शेखर माळशिकारे याने संबंधित विवाहितेला मारहाण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत पीडितेने तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या घटनेचा तपास पोलीस करत आहे.