पिंपरी (पुणे) -शहरातील पिंपळे गुरव परिसरात सोमवारी दोन श्वानांना पेट्रोल टाकून जाळण्यात आले. त्यानंतर त्या घटनास्थळापासून दीड किलोमीटर अंतरावर सात श्वान मृतावस्थेत आढळून आले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून श्वनानांच्या जीवावर कोण उठले आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आत्तापर्यंत 19 श्वनानांचा मृत्यू झाला आहे.
पिंपरीत आणखी सात श्वान मृतावस्थेत आढळले; एकूण 19 श्वानांचा मृत्यू - सांगवी पोलीस
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरात सोमवारी दोन श्वानांना पेट्रोल टाकून जाळण्यात आले.
पिंपरीत श्वान मृतावस्थेत आढळले
आणखी सात श्वान मृतावस्थेत आढळले-
दरम्यान, आज मंगळवारी घडलेल्या सात श्वानांचे मृतदेह आढळलेले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अवघ्या तीन दिवसात 19 श्वानांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. याप्रकरणी अद्याप आरोपी स्पष्ट झालेला नाही. अज्ञात व्यक्तीने श्वानांना जाणूनबुजून विष दिलं आहे, की अनवधानाने ही घटना घडलेली आहे. याचा सखोल तपास सांगवी पोलीस करत आहेत.