महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nana Patekar on Dr. Amol Kolhe : कलाकार म्हणून काम करणं हे माझ्या उपजीविकेचं साधन; अमोल कोल्हे प्रकरणी नाना पाटेकरांनी व्यक्त केलं मत

अमोल कोल्हे हे अभिनेता आहेत. कोणता रोल करायचं नाही? आणि कोणता करायचं? ते त्यांचं वैयक्तिक प्रश्न आहे. भूमिका करणं म्हणजे समर्थन नव्हे. मी देखील 30 वर्षांपूर्वी गोडसे यांचा रोल केला आहे. फक्त एवढंच की ती फिल्म इंग्रजीत होती. अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी दिली आहे. ( Nana Patekar on Dr. Amol Kolhe Nathuram Godse Role )

nana patekar
नाना पाटेकर

By

Published : Jan 22, 2022, 2:54 PM IST

Updated : Jan 22, 2022, 4:04 PM IST

पुणे - अमोल कोल्हे हे अभिनेता आहेत. ( Actor Amol Kolhe ) कोणता रोल करायचा नाही? आणि कोणता करायचा? ते त्यांचं वैयक्तिक प्रश्न आहे. भूमिका करणं म्हणजे समर्थन नव्हे. मी देखील 30 वर्षांपूर्वी गोडसेचा रोल केला आहे. फक्त एवढंच की ती फिल्म इंग्रजीत होती, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी दिली आहे. ( Nana Patekar on Dr. Amol Kolhe ) राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ ( Why I Killed Gandhi ) या चित्रपटात ( Amol Kolhe in Nathuram Godse Role ) त्यांनी नथुराम गोडसेचे भूमिका केल्यामुळे वाद सुरू झाला आहे. यावर ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांनी आपलं मत व्यक्त केलं.

माध्यमांशी बोलताना अभिनेते नाना पाटेकर

काय म्हणाले नाना?

अमोल कोल्हे हे अभिनेता आहेत. कोणता रोल करायचं नाही? आणि कोणता करायचं? ते त्यांचं वैयक्तिक प्रश्न आहे. भूमिका करणं म्हणजे समर्थन नव्हे. मी देखील 30 वर्षांपूर्वी गोडसे यांचा रोल केला आहे. फक्त एवढंच की ती फिल्म इंग्रजीत होती. म्हणजे मी त्यांचं समर्थन करतो का? मी एक कलाकार आहे आणि ती भूमिका मी एक कलाकार म्हणून केली. माझ्या उपजीविकेचं साधन तेच आहे म्हणून मला ते करावंच लागले.

सध्या प्रत्येक गोष्टीचं भांडवल करू नये. शिवाजी महाराजांची भूमिका केली तेव्हा कोणी काय म्हटलं नाही. या गोष्टी सोडून दिल्या पाहिजे. या गोष्टी येतात जातात. म्हणून या गोष्टी सोडून दिल्या पाहिजे, असे मत नाना पाटेकर यांनी मांडले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोविड मुक्त गाव अभियानचं ऑनलाईन उदघाटन सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे देखील उपस्थित होते. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

नानानी केलं अजित पवारांचं तोंड भरून कौतुक -

उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या पद्धतीने काम करत आहे ते त्या कामाची जाहिरात कधीच करत नाही. गुपचूप काम करत असतात. अजित पवार हा खूप चांगला नेता आहे. राजकारणी लोकांनी केलेल्या कामाला जितकी प्रसिद्धी मिळायला पाहिजे तितकी मिळत नाही. पक्ष बदलणाऱ्या माणसाला 5 वर्ष कुठलंही मंत्री किंवा पद दिलं गेलं नाही पाहिजे.

हेही वाचा -Sharad Pawar Support Amol Kolhe : अमोल कोल्हे यांच्या नथुराम गोडसेंच्या भूमिकेवर शरद पवार म्हणाले...

लता ताई बऱ्या होतील -

लता ताई बऱ्या होतील. आपलं आयुष्य हे इतकं सुंदर बनविलं आहे की त्या लवकर बरे होतील आणि घरी येतील, असं देखील यावेळी नाना पाटेकर म्हणाले.

अभिनेता किरण माने यांच्या प्रकरणावर देखील नाना म्हणाले की, मला राजकीय भूमिकेशी काहीही देणंघेणं नाही. माझी राजकीय भूमिका नव्हे तर समाजासाठी भूमिका काय आहे? हे महत्त्वाचं आहे. उगाचंच तो वाईट, हा चांगला यात मला वेळ नाही, असे देखील यावेळी नाना पाटेकर म्हणाले.

कीर्ती शिलेदार यांना श्रद्धांजली -

अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांच आज निधन झालं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. संगीत नाट्याला वाहिलेला अख्ख कुटुंब आहे, अशा शब्दात नाना यांनी यावेळी कीर्ती शिलेदार यांना श्रद्धांजली वाहिली.

Last Updated : Jan 22, 2022, 4:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details