महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चोरांना पाहून पोलीस पळाले, घटना सीसीटीव्हीत कैद - पुणे पोलीस चोरी घटना

पुण्यात चोरांना पाहून त्यांना पकडण्याऐवजी पोलिसच पळून गेल्याची घटना घडली आहे. पुण्यातील औंध परिसरातील सिद्धार्थनगर भागात मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कैद झाला आहे.

चोरांना पाहून पोलीस पळाले
चोरांना पाहून पोलीस पळाले

By

Published : Dec 29, 2020, 2:27 PM IST

पुणे - पोलीस आल्यावर चोर पळून गेले असे आपण अनेकदा ऐकले असेल. पण पुण्यात चोरांना पाहून त्यांना पकडण्याऐवजी पोलिसच पळून गेल्याची घटना घडली आहे. पुण्यातील औंध परिसरातील सिद्धार्थनगर भागात मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

नेमके काय घडले?
सिद्धार्थनगरातील शैलेश टॉवर सोसायटीत मध्यरात्री तीनच्या सुमारास चार चोरटे शिरले. त्यातील दोघांनी वॉचमनला चाकूचा धाक दाखवून पकडून ठेवले तर इतर दोघांनी सोसायटीत प्रवेश करून कटरच्या सहाय्याने कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान चोरट्यांच्या या हालचाली सोसायटीतील एका व्यक्तीने पाहिल्या आणि तात्काळ पोलिसांना फोन केला. काही वेळातच पोलीस घटनास्थळी हजर झाले. त्यांनी चोरांना पाहिलेही, पण या चोरांना पकडण्याऐवजी पोलिसच पळून गेले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

चोरांना पाहून पोलीस पळाले
पाचव्या मजल्यावरील घरात शिरलेचोरट्यांनी शैलेश टॉवर या सोसायटीतील चार बंद फ्लॅटचे कुलूप तोडले. पाचव्या घराचे कुलूप तोडत असताना शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार पाहिला आणि चोरीचा डाव फसला. सुदैवाने कुलूप तोडलेल्या फ्लॅटमध्ये कुणीही राहत नसल्याने चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही त्यांनी जाताना फक्त एका घरातील एलसीडी टीव्ही चोरून नेला.सर्व खेळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैददरम्यान सोसायटी बाहेर असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोर-पोलिसांचा हा सर्व खेळ कैद झाला आहे. सोसायटीमध्ये चोर घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तात्काळ दुचाकीवरून घटनास्थळी दाखल झाले हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहेत. त्यांच्याजवळ वायरलेस फोनही होते. ते चोरट्यांना पकडूही शकले असते. पण असे काही न करता त्यांनीच घटनास्थळावरून पळ काढला.

हेही वाचा - राष्ट्रवादी नगरसेवकाच्या खुनाची सुपारी, येरवड्यात रचला कट

ABOUT THE AUTHOR

...view details