पुणे- भिमाशंकर येथे नागफणी पॉईंटवरून ५०० फूट खोल दरीत पडून दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. हा परिसर डोंगरकड्याचा असल्याने शोध कार्यात अडथळे येत होते. मात्र२८ तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात शोध पथकाला यश आले आहे.
भिमाशंकर जवळील नागफणीपॉईंटला पडलेल्या दोघांना बाहेर काढण्यात एनडीआरएफ, पोलीस, गिर्यारोहक यांना२८ तासांनंतरयश आले आहे. दोघांचाही मृत्यू झाला असून शोधमोहीमेत एक महिला व मुलीचा मृतदेह मिळाला आहे. त्यांची हत्या करण्यात आली, की हीआत्महत्या आहे, हे अद्यापही अस्पष्ट आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून मृतदेहांची ओळख पटलेली नाही. पुढील तपास राजगुरुनगर पोलीस करत आहे