पुणे - भारतात गुरुवारी विज्ञान दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जवळच्या खोडद येथील जागतिक दुर्बीण प्रकल्पामधे २ दिवस विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे सर्वसामान्यांसाठी हा दुर्बीण प्रकल्प पाहण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध झाली आहे.
खोडद येथील जागतिक दुर्बीण प्रकल्पामध्ये २ दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
खोडद येथील सर्वात मोठा रेडिओ दुर्बीण प्रकल्प टाटा मुलभूत संशोधन संस्था आणि राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिक केंद्र यांच्यावतीने उभारण्यात आला आहे. विज्ञानाबद्दल ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये आवड निर्माण व्हावी.
खोडद येथील सर्वात मोठा रेडिओ दुर्बीण प्रकल्प टाटा मुलभूत संशोधन संस्था आणि राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिक केंद्र यांच्यावतीने उभारण्यात आला आहे. विज्ञानाबद्दल ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये आवड निर्माण व्हावी. यासाठी मागील ७ वर्षांपासून या ठिकाणी विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात येते आहे.
हा प्रकल्प २ दिवस पाहण्यासाठी सर्वांसाठी खुला असणार आहे. दरवर्षी २८ फेब्रुवारीला प्रदर्शनाबरोबरच शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधीही मिळते. तसेच, ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तयार केलेले प्रकल्प मांडण्याची संधीही यानिमित्ताने मिळते. या प्रदर्शनात अनेक नामवंत संस्था, शाळा व अभियांत्रिकी विद्यालये सहभागी झाले होते.